एका ओव्हरमध्ये 6 सिक्स, 6 डावांत 5 शतकं, 34 बॉलमध्ये झंझावाती शतक, 21 वर्षांच्या बॅट्समनचे भीम पराक्रम!

| Updated on: May 03, 2021 | 2:18 PM

21 वर्षांचा फलंदाज काय करु शकतो आणि काय नाही, हे एकेकाळी दाखवून दिलं होतं ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड हुक्स यांनी...! त्यांनी 21 वर्षांचे असताना एका ओव्हरमध्ये 6 षटकार, 6 डावांमध्ये 5 शतकं तसंच केवळ 34 चेंडूत तुफानी शतक ठोकलं होतं. (Australian Left hander David Hooks Cricket Career Hookes Born Today on this Day)

एका ओव्हरमध्ये 6 सिक्स, 6 डावांत 5 शतकं, 34 बॉलमध्ये झंझावाती शतक, 21 वर्षांच्या बॅट्समनचे भीम पराक्रम!
फोटो- प्रातिनिधिक
Follow us on

मुंबई : 21 वर्षांचा फलंदाज काय करु शकतो आणि काय नाही, हे एकेकाळी दाखवून दिलं होतं ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड हुक्स (David Hookes) यांनी…! त्यांनी 21 वर्षांचे असताना एका ओव्हरमध्ये 6 षटकार, 6 डावांमध्ये 5 शतकं तसंच केवळ 34 चेंडूत तुफानी शतक ठोकलं होतं. हे सगळे पराक्रम भल्याभल्या फलंदाजांनाही आणखी जमले नाहीत. पण 3 मे 1955 रोजी जन्मलेल्या डेव्हिड हुक्स यांनी करुन दाखवले होते. आज त्यांचा जन्मदिवस… त्याच निमित्ताने आपण त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीला उजाळा देत आहोत… (Australian Left hander David Hooks Cricket Career Hookes Born Today on this Day)

एका ओव्हरमध्ये 6 सिक्स, 6 डावांत 5 शतकं, 43 मिनिटांत 34 बॉलमध्ये शतक

डेव्हिड हुक्स यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यापूर्वी क्लबच्या सामन्यात डालविचच्या एका ओव्हरमध्ये सहा सिक्स ठोकले होते. वयाच्या 21 व्या वर्षी हुक यांनी दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना सहा डावांमध्ये पाच शतके ठोकली. या दरम्यान, अ‍ॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यांनी व्हिक्टोरियाविरुद्ध अवघ्या 34 चेंडूत 43 मिनिटांत शतक झळकावलं होतं.

या झंझावाती शतकी खेळीत त्यांनी 18 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्यांनी 12 मार्च 1977 मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि पहिल्याच पदार्पणाच्या सामन्यात टोनी ग्रीगच्या ओव्हरमध्ये सलग पाच चौकार ठोकले.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 32 शतके

डेव्हिड यांनी आपल्या कारकीर्दीत 178 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्यांनी 43.99 च्या सरासरीने 12671 धावा केल्या. प्रथम श्रेणीत त्यांनी 32 शतके आणि 65 अर्धशतकं ठोकली. यामध्ये नाबाद 306 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. लिस्ट ए सामन्यात 27.58 च्या सरासरीने त्यांनी 2041 धावा केल्या आहेत. डेव्हिड यांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 11 अर्धशतके झळकावली.

डेव्हिड यांची क्रिकेट कारकीर्द

डेव्हिड हुक्स यांनी ऑस्ट्रेलियाकडून 23 कसोटी सामने खेळले. 41 डावांत 3 वेळा नाबाद राहून त्यांनी 1306 धावा केल्या. या दरम्यान त्यांनी एक शतक तसंच 8 अर्धशतकं ठोकली. याशिवाय त्यांनी 39 एकदिवसीय सामने देखील खेळले. एकदिवसीय सामन्यांत त्यांनी 826 धावा केल्या. यामध्ये त्यांचा 76 हा सर्वोत्तम स्कोअर होता. एकदिवसीय सामन्यांत ते दोन वेळा नाबाद राहिले.

रस्त्यावरच्या भांडणात जीव गमावला

डेव्हिड हुक्स यांच्या आयुष्याचा करुण अंत झाला. वयाच्या 49 वर्षी हुक यांनी अखेरचा श्वास घेतला. जानेवारी 2004 मध्ये, मेलबर्नमधील एका हॉटेलच्या बाहेर झालेल्या भांडणात, त्यांना इतकी गंभीर दुखापत झाली की त्यांचा जीव वाचू शकला नाही.

(Australian Left hander David Hooks Cricket Career Hookes Born Today on this Day)

हे ही वाचा :

KKR vs RCB IPL 2021 : आयपीएलच्या मैदानात कोरोनाची एण्ट्री, क्रिकेटपटूला कोरोना, कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना लांबणीवर

IPL 2021 : के एल राहुल रुग्णालयात, पंजाबची संघमालकीण प्रीती झिंटाचं ट्विट, म्हणते, ‘राहुल तुला….’