IPL 2026 : बांग्लादेश सरकारचा IPL वर सर्वात मोठा वार, मुस्तफिजुर रहमानला बाहेर काढण्याचा असा घेतला बदला

IPL 2026 : सध्या भारत आणि बांग्लादेश संबंधात प्रचंड तणाव आहे. दोन्ही देशातील संबंध बिघडत चालले आहेत. त्याचा परिणाम क्रिकेटवर होऊ लागला आहे. आता बांग्लादेश सरकारने आयपीएलबद्दल एक मोठा निर्णय घेतलाय. हा भारत सरकारसाठी सुद्धा झटका आहे.

IPL 2026 : बांग्लादेश सरकारचा IPL वर सर्वात मोठा वार, मुस्तफिजुर रहमानला बाहेर काढण्याचा असा घेतला बदला
IPL 2026
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 05, 2026 | 3:20 PM

IPL ban in Bangladesh : बांग्लादेशने भारताला धक्का देणारा मोठा निर्णय घेतला आहे. बांग्लादेशने आयपीएल सामन्यांच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. आम्ही देशात आयपीएलच्या सामन्यांच्या टेलिकास्ट आणि ब्रॉडकास्टवर बंदी घालत आहोत, असं बांग्लादेश सरकारने म्हटलं आहे. मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर करण्यात आलं. त्यानंतर बांग्लादेशने आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. आयपीएलवर बंदी घालण्यासाठी बांग्लादेशच्या क्रीडा मंत्रालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला विनंती केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुस्तफिजुर रहमानला IPL मधून बाहेर काढल्यानंतर बांग्लादेशच्या क्रीडा मंत्रालयाशी संबंधित डॉक्टर आसिफ नजरूल यांनी एक पोस्ट केली होती. यात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांना बांग्लादेशात IPL सामन्यांचं प्रसारण रोखण्याचं आवाहन केलं होतं. आपल्या पोस्टमध्ये आसिफ नजरूल यांनी मुस्तफिजुर रहमानला देण्यात आलेल्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली. बांग्लादेश क्रिकेट किंवा त्यांच्याशी संबंधित कुठल्याही खेळाडूचा अपमान अजिबात सहन करणार नाही असं म्हटलं होतं.

आधी वर्ल्ड कपसाठी भारतात येण्यास नकार

बांग्लादेशने याआधी T20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतात यायला नकार दिला. त्यांनी बीसीसीआयला ईमेल करुन मुस्तफिजुर रहमानला बाहेर करण्याबद्दल स्पष्टीकरण मागितलं आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने एक ईमेल आयसीसीला सुद्धा केलाय. यात त्यांनी वर्ल्ड कपचा वेन्यू बदलण्याची मागणी केलीय. बांग्लादेशला आता भारताऐवजी श्रीलंकेत आपले T20 वर्ल्ड कपचे सामने खेळायचे आहेत. त्यामागे सुरक्षा कारणांचा हवाला दिलाय.

टोकाचा निर्णय

बांग्लादेशात IPL सामन्यांच्या प्रसारणावर बंदी घातल्याचा मुद्दा तूल पकडू लागला आहे. यावर आता शिक्कामोर्तब झालय. बांग्लादेशचा आता त्या देशांच्या यादीत समावेश झालाय, जिथे BCCI ची टी 20 लीग दाखवली जात नाही. बांग्लादेशात हिंदुंवर हल्ले सुरु आहेत. त्यामुळे बांग्लादेशी खेळाडूंची आयपीएलमधून हकालपट्टी करण्याची मागणी भारतात तीव्रतेने सुरु झालेली. केकेआरने (Kolkata Knight Riders) बीसीसीआयच्या आदेशानंतर रहमानला संघातून मुक्त केलं. याच एका मुद्द्यावरुन बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आता टोकाचा निर्णय घेतलाय.