Bhuvneshwar Kumar: मला पश्चाताप होतोय की…टीम इंडियातील कमबॅकवर भुवनेश्वर कुमारचं खोचक विधान, बीसीसीआयला सुनावलं

आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर भुवनेश्वर कुमारचे भारतीय संघात पुनरागमन होणार अशी चर्चा जोर धरत होती. आता यावर भुवनेश्वरने आपले मौन सोडले आहे.

Bhuvneshwar Kumar: मला पश्चाताप होतोय की...टीम इंडियातील कमबॅकवर भुवनेश्वर कुमारचं खोचक विधान, बीसीसीआयला सुनावलं
| Updated on: Aug 03, 2026 | 9:59 AM
भारतीय संघ सध्या नवनवीन खेळाडूंना संधी देत आहे, संघात सातत्याने अनेक बदल होताना दिसत आहे. संघ प्रत्येक मालिकेत नवनवीन खेळाडूंना संधी देऊन संघाचे नियोजन कसे चांगले होईल याकडे लक्ष देत आहे. अशात जे खेळाडू बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहेत त्या खेळाडूंना पुन्हा संघात संधी मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संघात काही गोलंदाजांचा कमबॅक व्हावा अशी आशा सर्वांनाच आहे.  अशीच एक मागणी खूप जोर धरत होती की भुवनेश्वर कुमारची संघात पुन्हा एकदा एन्ट्री घेईल, बीसीसीआय भुवनेश्वरला एक संधी पुन्ही देईल अशी चर्चा रंगलेली असताना आता भुवनेश्वर कुमारनेच यावर आपले मौन सोडले आहे.

भारतीय क्रिकेट संघातून बऱ्याच काळापासून बाहेर असलेल्या वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आता मौन सोडले आहे. भुवनेश्वर म्हणाला की, “आता भारतीय संघात परतण्याची किंवा न येण्याची पर्वा नाही. मी आता केवळ आवडीपोटी खेळत आहे. ” भुवनेश्वर 2022 पासून भारतीय संघाबाहेर आहे.  तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला सलग दोन आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

रविवारी आरसीबी पॉडकास्टवर बोलताना, भुवनेश्वर कुमार टीम इंडियामध्ये परतण्याबद्दल म्हणाला, “मी भारतासाठी खेळलो आहे. ही काही मिळवण्याची गोष्ट नाही. जर मला पुन्हा संधी मिळाली, तर ते उत्तमच आहे, मी सध्या जे काही करत आहे, ते खेळावरील प्रेमापोटी करत आहे. मला माहित आहे की मला शिस्तबद्ध राहावे लागेल. मी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. मी यूपी टी-20 लीग खेळत आहे. मला खात्री करायची आहे की मी क्रिकेटच्या सतत संपर्कात राहीन आणि त्याचबरोबर स्वतःला सावरण्यासाठी आवश्यक विश्रांतीही देईन.” भुवनेश्वरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त आपल्या आयुष्यात पुढे जाण्यास मदत केल्याबद्दल आपल्या कुटुंबाचे आभार मानले.

“मी शांत राहतो. माझा स्वभावच तसा आहे. आणि याचं श्रेय मी माझ्या कुटुंबाला देतो,  आम्ही घरी असताना कधीच क्रिकेटबद्दल बोलत नाही. मी भारतीय संघात कॅमबॅक करणार की नाही, माझं सिलेक्शन का झालं नाही किंवा माझं काय चुकलं? याबद्दल आम्ही घरी कधीच चर्चा करत नाही. आमच्या याच कृतीमुळे मला आता कसलाच पश्चाताप होत नाही. जेव्हा तुम्ही टीममध्ये खेळत असता तेव्हा तुम्हाला वाटतं की टीम सर्वात आधी असायला हवी, पण जेव्हा तुम्ही टीममधून बाहेर असता तेव्हा वाटतं की, यार मी टीममध्ये का नाहीये?, असंही भूवी म्हणाला.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us