AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: पाकिस्तानची पुन्हा जगासमोर नाचक्की, भारतीय संघाने दिला पराभवाचा धक्का

भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल सामना रंगला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा निकाल हा अपेक्षेप्रमाणे भारताच्याच बाजूने लागला, पण सामना हा खूपच रोमाचंकपद्धतीने पार पडला.

IND vs PAK: पाकिस्तानची पुन्हा जगासमोर नाचक्की, भारतीय संघाने दिला पराभवाचा धक्का
| Updated on: Aug 03, 2026 | 9:29 AM
Share
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की चाहत्यांसाठी पर्वणी असते. भारत पाक या महामुकाबल्यासाठी सर्वच चाहते उत्सुक असतात. असाच एक रोमांचक भारत पाक सामना काल रंगला. या सामन्यातही नेहमीप्रमाणे भारतीय संघाचा विजय झाला. भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पाणी पाजलं, झांबियामध्ये खेळल्या जात असलेल्या एशियन लेजेंड्स लीग 2026 च्या दुसऱ्या हंगामात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. माजी दिग्गजांनी भरलेल्या इंडियन रॉयल्स संघाने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तान पँथर्सला दोन गडी राखून पराभूत केले. भारताच्या विजयाचा नायक स्टार अष्टपैलू खेळाडू ऋषी धवन होता. धवनने उत्कृष्ट गोलंदाजी करत सामना जिंकून देणारे अर्धशतक झळकावले. इंडियन रॉयल्सचा कर्णधार नमन ओझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान पँथर्सने 20 षटकांत सहा गडी गमावून 167 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार इम्रान नझीर सर्वात आक्रमक ठरला, त्याने सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 29 चेंडूंमध्ये 47 धावा केल्या. दरम्यान, इब्रार हुसेनने 36 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या आणि तौफिक उमरने 23 चेंडूंमध्ये उपयुक्त 39 धावा केल्या. इंडियन रॉयल्सकडून शादाब जकाती आणि सुबोध भाटी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर मनप्रीत गोनी आणि ऋषी धवन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 168 धावांचे लक्ष्य गाठताना इंडियन रॉयल्सची सुरुवात डळमळीत झाली. कर्णधार नमन ओझा अवघ्या चार धावांवर बाद झाला. असद पठाणलाही केवळ नऊ धावा करता आल्या. मात्र, त्यानंतर फलंदाजांनी डाव सावरला आणि 17.3 षटकांत आठ गडी गमावून लक्ष्य गाठले. अष्टपैलू ऋषी धवनने शानदार खेळी करत 32 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांसह सामना जिंकून देणारी 50 धावांची खेळी केली.

सुबोध भाटीनेही फलंदाजीने जोरदार प्रभाव पाडला आणि 29 चेंडूंमध्ये तीन चौकार व चार षटकारांसह 46 धावांची वेगवान खेळी केली. दरम्यान, अभिषेक जलोटाच्या 19 चेंडूंतील 30 धावा आणि त्यानंतर अनरीत सिंगच्या 4 चेंडूंतील नाबाद 12 धावांच्या जोरावर संघाने विजय मिळवला. लीग 30 जुलै रोजी सुरू झाली असून, अंतिम सामना 10 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. भारतीय संघाने बांगलादेश टायगर्सला 19 धावांनी पराभूत करून आपल्या मोहिमेची सुरुवात केली आणि आता पाकिस्तानवर विजय मिळवून स्पर्धेत सलग दुसरे यश संपादन केले आहे. दरम्यान, पाकिस्तान पँथर्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

Follow Us
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...