
भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या आपल्या लव लाइफबद्दल बराच चर्चेत असतो. मागच्यावर्षी त्याचा नताशा स्टानकोविक बरोबर घटस्फोट झाला. हार्दिकला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे. तो कधी नताशा तर कधी हार्दिकच्या कुटुंबासोबत असतो. घटस्फोटानंतर दोघेही आपपाल्या आयुष्यात पुढे गेलेत. हार्दिकच नाव आता सिंगर जैस्मिन वालियासोबत जोडलं जातय. आयपीएल सामन्यांच्यावेळी ती मैदानात हार्दिकला सपोर्ट करताना दिसलेली. आता एका बॉलिवूड अभिनेत्रीने हार्दिक सोबतच्या अफेअरच्या बातम्यांवर खुलासा केलाय. आमच्या दोघांमध्ये बोलणं व्हायच हे सुद्धा या अभिनेत्रीने सांगितलं.
या अभिनेत्रीची सोशल मीडियावर भरपूर फॅन फॉलोइंग आहे. हार्दिक पंड्याच या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत नाव जोडलं गेलेलं. ही अभिनेत्री आता याबद्दल बोलली आहे. ‘सुरु होण्याआधीच संपलं’ असं तिने सांगितलं. आम्ही दोघं भेटायचो हे सुद्धा तिने मान्य केलं.
हार्दिक सोबतच्या अफेअरच्या अफवांवर मोकळेपणाने बोलली
नुकतीच ईशा गुप्ताने सिद्धार्थ कननला एक मुलाखत दिली. त्यावेळी ती वेगवेगळ्या विषयांवर बोलली. यावेळी ती हार्दिक पंड्यासोबतच्या अफेअरच्या अफवांवर मोकळेपणाने बोलली. तू हार्दिकला डेट केलं होतस का? असा प्रश्न ईशाला विचारण्यात आला. यावर ती आधी हसली. नंतर बोलली की, “नाही, आम्ही डेट केलं नाही. हा, पण काही महिने आम्ही बोलले”
दोघे कितीवेळा भेटले?
“डेटिंग असेल किंवा नसेल या स्टेजमध्ये आमचं नातं होतं. पण डेटिंगच्या आधी सर्वकाही संपलं” असं ईशा गुप्ताने सांगितलं. “एकदा-दोनदा आम्ही भेटल्याच तिने मान्य केलं. फक्त काही महिनेच बोलणं झालं होतं” असं तिने जोर देऊन सांगितलं.
बोलण्यामधून तिला काय समजलं?
आमच्या दोघांमध्ये बोलण झालं, तेव्हा जाणवलं की, “आम्ही दोघे एकसारखे नाही. परस्परासाठी योग्य नाही हे आमच्या लक्षात आल. त्याशिवया मला जास्त लाइमलाइट आवडत नाही. घरातल सिंपल आयुष्य आवडतं” असं ईशा गुप्ता म्हणाली. “आमचं सर्व काही तेव्हा बोलण्याच्या स्टेजवर होतं. हार्दिकमध्ये काही कमतरता नव्हती. पण आम्ही दोघे वेगळे होतो. आमच्यात फोनवरुन बोलणं सुरु झालेलं” असं तिने सांगितलं. ईशा गुप्ता बॉबी देओलची गाजलेली वेब सीरीज आश्रम 3 मध्ये होती. तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली.