CWG 2022: भारतीय बॉक्सरच्या मुलाची वेटलिफ्टिंग मध्ये कमाल, देशाला मिळवून दिलं गोल्ड मेडल

भारताच्या चॅम्पियन बॉक्सरच्या 19 वर्षाच्या मुलाने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कमाल केली आहे. जेरेमी लालरिनुंगाने वेटलिफ्टिंग मध्ये 67 किलो वजनी गटात गोल्ड मेडल मिळवलं.

CWG 2022: भारतीय बॉक्सरच्या मुलाची वेटलिफ्टिंग मध्ये कमाल, देशाला मिळवून दिलं गोल्ड मेडल
jeremy lalrinnunga
Image Credit source: instagram
| Updated on: Jul 31, 2022 | 5:38 PM

मुंबई: भारताच्या चॅम्पियन बॉक्सरच्या 19 वर्षाच्या मुलाने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कमाल केली आहे. जेरेमी लालरिनुंगाने वेटलिफ्टिंग मध्ये 67 किलो वजनी गटात गोल्ड मेडल मिळवलं. यूथ ऑलिम्पिक गेम्स मध्ये गोल्ड जिंकणाऱ्या जेरेमीने बर्मिंघम मध्ये एकूण 300 किलो वजन उचललं. कधी काळी जेरेमी रिंग मध्ये प्रतिस्पर्ध्यावर पंचने हल्लाबोल करायचा. त्याचा वेटलिफ्टिंग मध्ये प्रवेश करण्याचा किस्सा खूपच रोचक आहे.

राष्ट्रीय चॅम्पियन आहेत जेरेमीचे वडिल

जेरेमीचे वडिल ज्यूनियर नॅशनल चॅम्पियन बॉक्सर आहेत. जेरेमी आणि त्याचे चार भाऊ वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉक्सिंगच्या रिंग मध्ये उतरले. एका मुलाखतीत जेरेमीने सांगितलं की, “माझ्या गावात एक अकादमी होती. जिथे कोच वेटलिफ्टिंगचं ट्रेनिंग द्यायचा. मी माझ्या मित्राला ट्रेनिंग करताना बघितलं. माझ्या लक्षात आलं की, हा स्ट्रेंथचा खेळ आहे. मला याची गरज आहे”

2011 मध्ये करीयर बदललं

2011 साली आर्मी इंस्टीट्यूट ट्रायल्स साठी जेरेमीची निवड झाली. त्यानंतर त्याच्या करीयरने दिशा बदलली. जेरेमीचा व्यावसायिक वेटलिफ्टर म्हणून प्रवास सुरु झाला. त्याने 2016 वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिप मध्ये 56 किलो वजनी गटात रौप्यपदक विजेती कामगिरी केली. त्यानंतर त्याने पुढच्यावर्षी याच इवेंट मध्ये आणखी एक रौप्यपदक मिळवलं. जेरेमीने त्यानंतर ज्यूनियर एशियन चॅम्पियनशिप मध्ये ब्राँझ मेडल मिळवलं. जेरेमीने वयाच्या 7 व्या वर्षापासून बॉक्सिंग सुरु केली. त्याच्या वडिलांनी 1988 मध्ये बॉक्सिंग सुरु केली होती. जेरेमीच्या वडिलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व करायचं होतं. पण त्यांच स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. म्हणूनच आपल्या मुलांनी बॉक्सिंगकडे वळावं अशी त्यांची इच्छा होती.

फायनल मध्ये कडवी लढत

स्नॅच मध्ये 140 किलो वजन उचलून रेकॉर्ड केला. क्लीन अँड जर्क मध्ये जेरेमीने 160 किलो वजन उचललं. तिसऱ्या प्रयत्नात त्याला 165 किलो वजन उचलायच होतं. पण शक्य झालं नाही. जेरेमीने एकूण 300 किलो वजन उचललं. त्याने रेकॉर्ड केला. नेवोने शेवटच्या प्रयत्नात 174 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते शक्य झालं नाही. त्याला रौप्यपदकावर समाधान मानाव लागलं.