इमरान खान वेडे झाले? थेट मनोरुग्ण म्हणून…पाकिस्तानातून खळबळ उडवून देणारी माहिती समोर!
पाकिस्तानातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इमरान खान हे मनोरुग्ण असल्याचं तिथल्या लष्कराने सांगितलं आहे. त्यामुळे तिथे आता तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Imran Khan : भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. पाकिस्तानातील शाहबाज शरीफ सरकारने अलिकडेच लष्करप्रमुख आसीम मुनीर याला मोठी ताकद बहाल केली असून त्याचे अधिकार वाढवलेले आहेत. असे असताना राजकीय पातळीवर मात्र तेथे वातावरण ढवळून निघाले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे सध्या तुरुंगात असून त्यांच्यावर अत्याचार केले जात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळेच इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून पाकिस्तानात तणावाची स्थिती आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता मोठी अपडेट समोर आली आहे. इम्रान खान हे थेट मनोरुग्ण झाल्याचा दावा केला जातोय.
नेमकी काय माहिती समोर आली?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे सध्या आडियाला तुरुंगात बंद आहेत. गेल्या बऱ्याच महिन्यांपासूनते तुरुंगाच्या बाहेर आलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी इमरान खान यांची तुरुंगातच हत्या करण्यात आली आहे, अशी अफवा पसरली होती. त्यांना कोणालाही भेटू दिले जात नसल्यानेच या अफवेला बळ मिळाले होते. तेव्हापासून इमरान खान यांच्या सुटकेसाठी पीटीआय पक्षाचे नेते आणि कार्यक्रम संपूर्ण पाकिस्तानात आंदोलन करत आहेत. त्यामुळे शाहबाज शरीफ यांच्या सरकारवर दबाव वाढत आहे. असे असतानाच आता पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने मोठे विधान केले आहे. इमरान खान हे मनोरुग्ण जाले आहेत. ते देशद्रोह्यांची भाषा बोलत आहेत, असे या प्रवक्त्याने म्हटले आहे. सोबतच इमरान खान हे तुरुंगातून सामान्य पाकिस्तानी नागरिकांना भडकवत आहेत. सेनेविरोधात लढा उभारण्यासाठी इमरान खान सामान्यांना प्रोत्साहित करत आहेत. ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असेही या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानात तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता
दरम्यान, आता लष्कराच्याच प्रवक्त्याने इमरान खान हे मनोरुग्ण असल्याचे म्हटल्यामुळे पाकिस्तानात सर्वत्र खळबळ उडाली आहे. या विधानामुळे आता पीटीआयचे कार्यकर्ते आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. परिणामी पाकिस्तानातील वातावरण आणखी चिघळू शकते. त्यामुळेच असा कोणताही अनर्थ घडू नये यासाठी पाकिस्तानी सरकार काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. इमरान खान यांना कोणाशीही भेटण्यावर बंदी घातली जाऊ शकते. म्हणजेच वकील, कुटुंब, पार्टीचे नेते अशा कोणालाही इमरान खान यांना भेटू दिले जाणार नाही. सोबतच पाकिस्तानात सरकार आणि लष्कराविरोधात मोठे आंदोलन उभारण्यावरही बंदी घातली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
