CWG 2022: टेबल टेनिसमध्ये भारताने जिंकले आणखी एक गोल्ड मेडल

CWG 2022: 'लॉन बॉल' या भारतीयांसाठी नव्या असलेल्या क्रीडा प्रकारात कॉमनवेल्थ मध्ये भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

CWG 2022: टेबल टेनिसमध्ये भारताने जिंकले आणखी एक गोल्ड मेडल
| Edited By: | Updated on: Aug 02, 2022 | 9:22 PM

मुंबई: ‘लॉन बॉल’ या भारतीयांसाठी नव्या असलेल्या क्रीडा प्रकारात कॉमनवेल्थ मध्ये भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय महिला टीमने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. फायनल मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघावर 17-10 असा विजय मिळवला. चढ-उतारांनी भरलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने सरस कामगिरी केली. आधी भारतीय महिला टीमने दक्षिण आफ्रिकेवर आघाडी घेतली होती. पण नंतर ते पिछाडीवर पडले. पण नंतर आपल्या कामगिरीचा स्तर उंचावत ऐतिहासिक सुवर्ण पदाकाला गवसणी घातली.

तिसऱ्या राऊंड मध्ये स्कोर बरोबरीत होता. त्यानंतर महिला संघाने आघाडी वाढवायला सुरुवात केली. 6 राऊंड नंतर स्कोर 7-2 होता. म्हणजे मजबूत स्थिती होती.

10 व्या एन्ड नंतर दक्षिण आफ्रिकेने 8-8 अशी बरोबरी साधली.

12 व्या एन्ड नंतर भारताने पुनरागमन केलं. दोन्ही संघांचे स्कोर आता 10-10 असे बरोबरीत होते.

14 व्या एन्ड मध्ये भारतीय संघाने 3 पॉइंटस मिळवले. भारताची दक्षिण आफ्रिकेवर 15-10 अशी आघाडी झाली. त्यानंतर थेट सुवर्णपदक विजेती कामगिरी केली.

जाणून घ्या या खेळाचा इतिहास

भारतीय महिला संघाने सेमीफायनल मध्ये न्यूझीलंडवर 16-13 असा विजय मिळवला होता. लवली चौबे, पिंकी, नयानमोनी साइकिया आणि रूपा रानी या चार खेळाडूंनी भारताकडून इतिहास रचला.

कॉमनवेल्थ गेम्स मध्ये लॉन बॉलचा 1930 सालापासूनच खेळला जातोय. फक्त एकदाच 1966 सालच्या गेम्स मध्ये लॉन बॉल कॉमनवेल्थचा भाग नव्हता. लॉन बॉल मध्ये सर्वात जास्त गोल्ड मेडल जिंकण्याचा रेकॉर्ड इंग्लंडच्या नावावर आहे. त्यांनी 21 गोल्ड मेडल य़ा खेळात मिळवले आहेत. स्कॉटलंड 20 गोल्डसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत कॉमनवेल्थ मध्ये लॉन बॉलच्या क्रीडा प्रकारात कधीही मेडल जिंकलं नव्हतं. आता पहिल्यांदाच भारत या खेळात पदविजेती कामगिरी करणार आहे.