AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजू सॅमसन वैभव सूर्यवंशीमुळे राजस्थान रॉयल्स सोडणार? आकाश चोप्राने सांगितली आतली गोष्ट

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझींमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे. काही खेळाडूंना रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. असं असताना राजस्थान रॉयल्स संघ संजू सॅमसनला सोडू शकते अशी चर्चा रंगली आहे. असं असताना चर्चेदरम्यान आकाश चोप्राने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

संजू सॅमसन वैभव सूर्यवंशीमुळे राजस्थान रॉयल्स सोडणार? आकाश चोप्राने सांगितली आतली गोष्ट
संजू सॅमसन वैभव सूर्यवंशीमुळे राजस्थान रॉयल्स सोडणार? आकाश चोप्राने सांगितली आतली गोष्टImage Credit source: Twitter/TV9 malayalam
| Updated on: Aug 09, 2025 | 7:35 PM
Share

आयपीएल स्पर्धेत गेल्या काही वर्षांपासून संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. या संघाची सूत्र हाती घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्स 2022 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र त्यानंतर संघाची कामगिरी काही चांगली राहिली नाही. मागच्या पर्वातही संघाने काही खास केलं नाही. असं असताना संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडणार अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे. पण या बातम्यांमध्ये किती तथ्य हे अद्याप काही स्पष्ट नाही. आता या विषयावर आकाश चोप्राने आपलं मत मांडलं आहे. संजू सॅमसनची गरज राजस्थानला नसल्याचं दिसत आहे, असं त्याने सांगितलं. कारण वैभव सूर्यवंशीमुळे राजस्थानकडे दोन्ही सलामीवीर आहेत, अशी शक्यता त्याने वर्तवली. युट्यूब चॅनेलवर त्याने याबाबतचं विश्लेषण केलं आहे. वैभव सूर्यवंशीच्या आगमनामुळे संघाला एक चांगला खेळाडू मिळाला आहे. वय आणि त्याचा खेळ पाहून संघाला भविष्यात बराच फायदा होणार आहे. इतकंच काय तर यशस्वी जयस्वालला ओपनिंगसाठी एक चांगला पार्टनर मिळणार आहे.

संजू सॅमसन या संघात स्वत:ला फिट मानत नसावा, असं मत आकाश चोप्राने व्यक्त केलं आहे. ‘मला वाटते की नव्या लिलावात संघाचा जो विचार आहे. त्यात संजू सॅमसनची मोठी भूमिका असेल, पण आता वाटते की तसं नाही. वैभव सूर्यवंशी आला आहे आणि दोन ओपनर तयार आहेत. ध्रुव जुरेलपण वर फलंदाजी करू शकतो. कदाचित संजूचं मन असं असावं की निघायची वेळ झाली आहे. तो असाही विचार करू शकतो. मला माहिती नाही. ही फक्त एक शक्यता आहे. मला माहिती नाही की त्याच्या आणि राजस्थानच्या मनात काय सुरु आहे.’

संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स सोडलं तर कोणते संघ त्याला घेण्यास तयार असतील? यावर आकाश चोप्राने सांगितलं की, कोलकाता नाईट रायडर्ससाठी संजू हा चांगला पर्याय ठरू शकतो. कोलकात्याला सलामी फलंदाज, विकेटकीपर आणि अजिंक्य रहाणेनंतर एक चांगला कर्णधार पाहीजे. हे तिन्ही संजू सॅमसनच्या माध्यमातून येतील. त्यामुळे संघ मजबूत होईल. दुसरीकडे, आकाश चोप्राच्या मते मुंबई इंडियन्स देखील एका विकेटकीपरच्या शोधात आहे. संजू त्यांच्यासाठीही चांगला पर्याय ठरू शकतो.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था