Abhishek Sharma Yuvraj Singh : अभिषेक शर्माने वाढदिवशी घेतलेली सुट्टी टीमला महागात पडली; युवराजने टाकलेला व्हिडिओ

Abhishek Sharma Viral Video : अभिषेक शर्माच्या वाढदिवसाला त्याची टीम पराभूत झाली आहे. त्याशिवाय अभिषेक शर्मा आणि युवराज सिंग या दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळतो आहे.

Abhishek Sharma Yuvraj Singh : अभिषेक शर्माने वाढदिवशी घेतलेली सुट्टी टीमला महागात पडली; युवराजने टाकलेला व्हिडिओ
abhishek sharma 26 th birthday yuvraj singh
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 7:26 PM

Abhishek Sharma Birthday : जर तुम्ही क्रिकेटरला विचारलं की वाढदिवस की क्रिकेट मॅच तर नक्कीच तो मॅचची निवड केल्याशिवाय राहणार नाही. परंतु आज शेर ए पंजाब टी20 लीगमध्ये दुसरंच चित्र पाहायला मिळालं आहे. अभिषेक शर्माचा आज वाढदिवस आहे. तो 26 वर्षांचा झाला आहे. टीम इंडियामध्ये खेळणारा अभिषेक हा अमृतसर सूरमा या संघाचा कर्णधारही आहे. परंतू आज तो त्याच्या टीमसोबत मैदानात खेळताना दिसला नाही. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सामना असल्याने तो मैदानात उतरला नाही. त्याने सुट्टी घेतली आहे. पण त्यामुळे त्याच्या संघाचा पराभव झाला आहे.

अभिषेकच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. मोहालीतल्या पीसीए स्टेडियमवर पाऊस पडल्याने हा सामना 11 षटकांचा झाला होता. अमृतसरने पहिल्यांदा फलंदाजी करताना 105 धावाच केल्या. अभिषेक शर्मा नसल्याने त्यांच्या संघाची सुरुवातच फसली. दरम्यान, प्रत्युत्तरात बठिंडा रॉयल्सने हरनूर सिंगने 15 चेंडूंमध्ये नाबाद 29 धावा केल्या, तर कर्णधार उदय सहारनने 300 च्या स्ट्राईक रेटने 20 चेंडूंमध्ये 60 धावा केल्या. त्याने 20 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 6 षटकार मारून बठिंडाला अवघ्या 47 चेंडूंमध्ये सामना जिंकायला मदत केली.

दरम्यान, त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा मार्गदर्शक आणि भारताचा दिग्गज ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंगने त्याला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्यात. युवीने यासंदर्भातला व्हिडिओ पोस्ट केला आहे.

कान पकडून…

पहिल्याच चेंडूपासून जोरदार फटकेबाजी करणारा भारताचा ओपनर फलंदाज अभिषेक शर्मा या व्हिडिओमध्ये दिसतो आहे. त्याच्यासोबत युवीही दिसतोय. युवराज त्याचा चेला अभिषेकला कानाला धरुन उठा-बशा करायला लावताना दिसतो आहे. हा मजेदार व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच भावला आहे. या व्हिडिओत तो अभिषेककडून चार वचनं देताना दिसत आहे. ज्यामध्ये पहिलं वचन हे पहिल्याच चेंडूवर जोरदार फटका मारणार नाही असं म्हटलं आहे. तर दुसऱ्यामध्ये वचनामध्ये मी मैदानात उतरल्यावर आधी वेळ घेईन मग फलंदाजी सुरु करेन असं म्हणतोय. तर मी ठरवून धावा करेन असं तिसऱ्यांदा म्हणतोय. तर पहिल्या चेंडूवर कॅच देणार नाही, असंही म्हणतो आहे. त्यामुळे आता त्याचा आणि युवराजचा हा अतरंगी व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आला आहे.

चाहत्यांना काय भावलं?

दरम्यान, युवराजचा ही विनोदी शैली चाहत्यांना भावली आहे. अभिषेकची आक्रमक फलंदाजीची शैली पाहता त्याला आता एका मार्गदर्शकाप्रमाणे युवराज क्रीजवर कसं खेळलं पाहिजे, सावध भूमिका घेतल्या पाहिजे, या सर्व संघासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी अगदी हलक्या-फुलक्या प्रकारात समजावून सांगत आहे.

दरम्यान, अभिषेकच्या कारकीर्दीला घडवण्यामध्ये युवराज सिंगचा मोठा हात राहिला आहे. अमृतसरवरुन आलेल्या अभिषेकचा टीम इंडियातील सहभाग हा केवळ युवीमुळेच शक्य झाल्याचंही अभिषेक सांगतो. युवी स्वतःही एक डावखुरा फलंदाज आहे, त्यामुळे त्याने अभिषकच्या खेळाला योग्य दिशा दिली. त्यानंतर अभिषेक आयपीएलमध्ये हैदराबाद संघाकडून सलामीवीर म्हणून खेळू लागला. दरम्यान, 2018मध्ये तो अंडर 19 संघाचा विश्वचषकही जिंकलेला खेळाडू आहे.

आयपीएल गाजवणारा अभिषेक शर्मा हा आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय टी-२० फलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 56 टी-20 आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये 55 डावांमध्ये 178.25 च्या वादळी स्ट्राईकने 1629 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकं आणि अकरा अर्धशतकांचा समावेश आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us