शुभमन गिल आऊट झाल्यावर अबरारने जे केलं ते पाहून नेटकरी संतापले, म्हणाले ‘चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर जाण्याचा रस्ता’

शुभमन गिल आऊट झाल्यानंतर अबरार अहमदने ड्रेसिंग रूमचा रस्ता दाखवला होता. आता सामना जिंकल्यावर नेटकऱ्यांनी अबरारला चांगलेच सुनावले आहे.

शुभमन गिल आऊट झाल्यावर अबरारने जे केलं ते पाहून नेटकरी संतापले, म्हणाले चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर जाण्याचा रस्ता
Abrar
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 24, 2025 | 5:49 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 242 धावांचे आव्हान टीम इंडियाने सहज पार केले. या सामन्यात 6 गडी राखून भारताने विजय मिळवला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रंगलेल्या या सामन्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा पराभव केला. पाकिस्तानकडून फिरकी गोलंदाजावर अबरार अहमद एकमेव उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू होता. त्याने २८ धावांत १ बळी घेतला. जबरदस्त फॉर्मात आलेल्या शुभमन गिलची महत्त्वाची विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला. 

भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर गिल सलग दुसऱ्यांदा अर्धशतकाकडे वाटचाल करत होता. पाकिस्तानविरुद्ध तुफान फटकेबाजी नंतर ४६ धावांवर असताना तो अबरारच्या चेंडूवर बाद झाला. गिल बाद झाल्यानंतर, अहमदने डोळ्यांनी ड्रेसिंग रूमकडे जाण्याचा इशारा केला होता. नेटकऱ्यांना अबरारचे हे वागणे खटकले. भारताने सामना जिंकल्यानंतर सोशल मीडियावर फिरकी गोलंदाजावर चांगलीच टीका झाली. नेटकऱ्यांनी तयार केलेले हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावरल होईल.

एका यूजरने ‘तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतला’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने मजेशीर अंदाजात मॅचमधून बाहेर जाण्याचा रस्ता दाखवला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अवघ्या दोन सामन्यांनंतर, पाकिस्तान स्पर्धेबाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या आठवड्यात कराची येथे झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्धने पाकिस्तानचा ६० धावांनी पराभव केला. त्यानंतर रविवारी दुबई येथे भारताविरुद्ध सामन्यात पाकिस्तानला हार पत्करावी लागली आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.