Retirement | क्रिकेट विश्वात खळबळ, World Cup 2023 मध्ये निवड झालेल्या खेळाडूची वयाच्या 24 व्या वर्षी निवृत्ती जाहीर
World Cup 2023 : वर्ल्ड कपला अवघे काही दिवसच बाकी आहेत. त्याआधी एका क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. खेळाडूच्या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड 2023 कप स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होत आहे. मोठ्या प्रमाणात वर्ल्ड कपची धामधूम सुरु आहे. वर्ल्ड कपला अवघे काही दिवसच बाकी आहेत. त्याआधी एका क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. खेळाडूच्या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये लखनऊ टीमकडून खेळणाऱ्या नवीन उल हक याने वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलंय.
नवीन उल याने आतापर्यंत 7 एकदिवसीय आणि 27 टी 20 आय सामन्यात अफगाणिस्तानचं प्रतिनिधितेव केलं आहे. नवीनने अफगाणिस्तानसाठी वनडेत 14 आणि टी 20 मध्ये 34 विकेट्स घेतल्या आहेत. नवीनने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची माहिती दिली आहे. दरम्यान अफगाणिस्तान आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ही 7 ऑक्टोबरपासून करणार आहे. अफगाणिस्तान वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. हशमतुल्लाह शाहिदी हा अफगाणिस्तानचं वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करणार आहे.
नवीन उल हक काय म्हणाला?
देशाचं प्रतिनिधित्व करणं हा सन्मानजनक आणि अभिमानास्पद बाब आहे. मी वर्ल्ड कपनंतर निवृत्त होत असल्याचं जाहीर करतोय. मात्र मी टी 20 क्रिकेट खेळत राहणार” असं म्हणत नवीनने वनडे क्रिकेटला अलविदा करत असल्याचं जाहीर केलं.
वर्ल्ड कप 2023 साठी अफगाणिस्तानचा संघ
हशमतुल्लाह शाहिदी (कप्तान), इब्राहिम झद्रान, रहमतुल्लाह गुरबाज, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, इकराम अली खिल, रियाज हसन, अब्दुल्लाह ओमरजई, राशिद खान, अब्दुल रहमान, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी आणि नवीन उल हक.
