एकदम कडक उत्तर! जाफरने मायकल वॉन बरोबर जुना हिशोब केला चुकता

| Updated on: Dec 28, 2021 | 5:30 PM

आज वसीम जाफरने अशाच एका व्हिडिओ टि्वटमधून मायकल वॉनची खिल्ली उडवली आहे. जाफरच्या हातात एक मोबाइल आहे. तो मोबाइलवर क्लिक करतो, त्यावर...

एकदम कडक उत्तर! जाफरने मायकल वॉन बरोबर जुना हिशोब केला चुकता
BCCI/Twitter
Follow us on

मुंबई: अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव झाल्यानंतर इंग्लंडसाठी तिसरा कसोटी सामना ‘करो या मरो’ होता. मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी मेलर्बन कसोटीत विजय मिळवणं इंग्लंडसाठी आवश्यक होतं. पण तिसऱ्या कसोटीतही इंग्लिश संघ फेल झाला. कर्णधार जो रुटचा (50) अपवाद वगळता इंग्लंडचे अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यांचा पहिला डाव 185 धावात आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावात स्कॉट बोलँडच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव अवघ्या 68 धावात कोसळला. इंग्लंडसाठी खरंतर हा मानहानीकारक पराभव आहे. (After england lost in Ashes wasim jaffer answers to michael vaughan)

अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात नऊ विकेटने दुसऱ्या सामन्यात 275 धावांनी पराभव झाला. तिसऱ्या सामन्यात तर रुट आणि कंपनीने त्यापेक्षाही वाईट कामगिरी केली. त्यामुळे सोशल मीडियावर इंग्लिश संघाला अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल केले जातेय.

भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने याच संधीचा फायदा उचलून इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉन बरोबरचा जुना हिशोब चुकता केला. सोशल मीडियावर वसीम जाफरच्या टि्वटची नेहमीच चर्चा होते. कारण त्याचे टि्वट नेहमीच क्रिएटिव असतात.

आज वसीम जाफरने अशाच एका व्हिडिओ टि्वटमधून मायकल वॉनची खिल्ली उडवली आहे. जाफरच्या हातात एक मोबाइल आहे. तो मोबाइलवर क्लिक करतो, त्यावर मायकल वॉनचं 2019 मधलं एक टि्वट दिसतं. जाफरने शेवटी थम्प-अपही केलं आहे. वसीम जाफरचं हे टि्वट क्रिकेट चाहत्यांमध्ये हिट झालं असून वॉनने सुद्धा ‘वेरी गुड वसीम’ म्हणून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

2019 मध्ये हॅमिल्टनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारताचा डाव 92 धावात आटोपला होता. त्यावेळी इतरांप्रेमाणे मायकल वॉननेही विराट कोहलीच्या संघावर टीका केली होती. तेच टि्वट जाफरने आज अत्यंक कल्पक पद्धतीने सादर केले.

संबंधित बातम्या:

रोहित शर्मामुळे ODI टीमचं सिलेक्शन पुढे ढकललं, 4 वर्षांनंतर दिग्गज खेळाडूचं पुनरागमन
IND VS SA: निगीडी-रबाडासमोर भारतीय फलंदाजांची सपशेल शरणागती, दोघांनी मिळून काढल्या 9 विकेट
20 षटकारांसह 253 धावा, स्फोटक फलंदाजीसह संघ विजयी, धडाकेबाज फलंदाजाची टीम इंडियात निवड होणार?

(After england lost in Ashes wasim jaffer answers to michael vaughan)