Team India : टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटर्सनी सुपरस्टार रजनीकांत यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट

| Updated on: Mar 18, 2023 | 1:31 PM

IND vs AUS 1st ODI : स्टे़डियममधला कॅमेरा रजनीकांत यांच्यावर जाताच वानखेडेमधील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. यातून रजनीकांत यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये असलेली क्रेझ दिसून आली.

Team India : टीम इंडियाच्या या क्रिकेटर्सनी सुपरस्टार रजनीकांत यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट
Rajnikanth -team india
Image Credit source: instagram
Follow us on

IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाच्या क्रिकेटपटुंनी आज सुपरस्टार रजनीकांत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. रजनीकांत काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वनडे सामन्याला उपस्थित होते. त्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यांचा आनंद लुटला. मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अमोल काळे हे रजनीकांत यांच्या शेजारी बसून त्यांच्याशी वार्तालाप करत असल्याचे फोटो मुंबई क्रिकेट असोशिएशनने त्यांच्या टि्वटर अकाऊंटवर शेअर केलेत.

स्टे़डियममधला कॅमेरा रजनीकांत यांच्यावर जाताच वानखेडेमधील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. यातून रजनीकांत यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये असलेली क्रेझ दिसून आली. रजनीकांत यांनी काल व्हाइट टी-शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट परिधान केली होती. वानखेडेवरच्या व्हीआयपी हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये बसून त्यांनी पहिल्या वनडेचा आनंद घेतला.

मुंबईत मॅचला सेलिब्रिटींची कमतरता नसते

टीम इंडियाच्या मुंबईत मॅच असतात, तेव्हा सेलिब्रिटींची कमतरता नसते. अभिनेता आमिर कान, रितेश देशमुख आणि सोहेल खान मेन इन ब्ल्यूसाठी चिअर करताना दिसतात. यावेळी सुपरस्टार रजनीकांत हार्दिक पंड्या अँड कंपनीचा उत्साह वाढवण्यासाठी आले होते. मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी रजनीकांत यांना पहिल्या वनडेला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं होतं.


टीम इंडियाच्या कुठल्या क्रिकेटर्सनी रजनीकांत यांची भेट घेतली?

“रजनीकांत सतत व्यस्त असतात. त्यांनी माझं निमंत्रण स्वीकारल्यामुळे मी आनंदी आहे. ते संपूर्ण दिवस इथे थांबले ही मोठी बाब आहे” असं अमोल काळे टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले.

रजनीकांत यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांची पत्नी लता सोबत होती. आज कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि टीम इंडियाच्या अन्य क्रिकेटपटुंनी रजनीकांत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.