IPL 2022 Awards Winners list: यंदाच्या सीजनमधली पुरस्कार विजेत्यांची यादी, जाणून घ्या कोणाला कुठला पुरस्कार मिळाला

| Updated on: May 30, 2022 | 10:50 AM

IPL 2022 Awards Winners list: पॉइंट्स टेबलमध्येही हा संघ पहिल्या स्थानावर होता. गुजरात टायटन्सने फायनलमध्येही तसाच खेळ दाखवला. यंदाच्या सीजनमध्ये गुजरात आणि लखनौ या दोन नवीन संघांच्या समावेशामुळे एकूण 10 संघ झाले.

IPL 2022 Awards Winners list: यंदाच्या सीजनमधली पुरस्कार विजेत्यांची यादी, जाणून घ्या कोणाला कुठला पुरस्कार मिळाला
Gujarat Titans
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीग 2022 (IPL 2022) मोसमाची सांगता झाली आहे. काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन संघांमध्ये फायनल झाली. नाणेफेक जिंकून राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनने (Sanju Samson) प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांनी निर्धारित 20 षटकात 130 धावा केल्या. गुजरातने तीन विकेट गमावून आरामात हे लक्ष्य पार केलं. गुजरातने फायनल सामना सात विकेट राखून जिंकला. इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेला 6 वर्षानंतर नवीन चॅम्पियन मिळाला आहे. गुजरात टायटन्स आयपीएलचा किताब जिंकणारा सातवा संघ बनला आहे. गुजरातने याच सीजनमध्ये आयपीएलमध्ये डेब्यू केला होता. या संघाने कमालाची कामगिरी केली. IPL 2022 मध्ये पहिल्या सामन्यापासून या संघाने दमदार कामगिरी केली होती.

एकूण 10 संघ 74 सामने

पॉइंट्स टेबलमध्येही हा संघ पहिल्या स्थानावर होता. गुजरात टायटन्सने फायनलमध्येही तसाच खेळ दाखवला. यंदाच्या सीजनमध्ये गुजरात आणि लखनौ या दोन नवीन संघांच्या समावेशामुळे एकूण 10 संघ झाले. आयपीएल लीगमध्ये एकूण 74 सामने खेळले गेले. आयपीएल ही क्रिकेटमधली एक मोठी लीग स्पर्धा आहे. इथे खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतो.

जाणून घ्या IPL 2022 मधील पुरस्कार विजेते

विजेते – गुजरात टायटन्स

उप विजेते – राजस्थान रॉयल्स

तिसरं स्थान – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर

चौथं स्थान – लखनौ सुपर जायंट्स

ऑरेंज कॅप – जोस बटलर

पर्पल कॅप – युजवेंद्र चहल

IPL इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट – उमरान मलिक

मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीजन – जोस बटलर

मॅक्सिमम सिक्सर पुरस्कार – जोस बटलर

गेम चेंजर ऑफ सीजन – जोस बटलर

आयपीएलमधील वेगवान चेंडू – लॉकी फर्ग्युसन

सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन – दिनेश कार्तिक

फेअर प्ले अवॉर्ड – राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स

पावरप्लेयर ऑफ द सीजन – जोस बटलर

कॅच ऑफ द सीजन – इविन लुइस