GT vs RR IPL 2022 Final Match Report: ‘आपडे GT गया’, पहिल्याच सीजनमध्ये गुजरात चॅम्पियन, हार्दिक ‘हिरो’

GT vs RR IPL 2022 Final Match Report: गुजरात टायटन्सने आयपीएमध्ये पहिलं विजेतेपद मिळवलं आहे. गुजरातने याच सीजनमध्ये आयपीएलमध्ये डेब्यू केला होता. या संघाने कमालाची कामगिरी केली आहे.

GT vs RR IPL 2022 Final Match Report: 'आपडे GT गया', पहिल्याच सीजनमध्ये गुजरात चॅम्पियन, हार्दिक 'हिरो'
IPL 2022 Gujarat titans ChampionImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 6:27 AM

मुंबई: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans IPL champion) आयपीएमध्ये पहिलं विजेतेपद मिळवलं आहे. गुजरातने याच सीजनमध्ये आयपीएलमध्ये डेब्यू केला होता. या संघाने कमालाची कामगिरी केली आहे. IPL 2022 मध्ये पहिल्या सामन्यापासून या संघाने दमदार कामगिरी केली होती. पॉइंट्स टेबलमध्येही हा संघ पहिल्या स्थानावर होता. गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर (GT vs RR) सात विकेट राखून विजय मिळवला. राजस्थानने विजयासाठी दिलेलं 131 धावांच लक्ष्य गुजरातने आरामात पार केलं. इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेला 6 वर्षानंतर नवीन चॅम्पियन मिळाला आहे. गुजरात टायटन्स आयपीएलचा किताब जिंकणारा सातवा संघ बनला आहे. गुजरातने राजस्थानच्या कीर्तिमानशीही बरोबरी केली. 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्याच सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) विजेतेपद मिळवलं होतं. आज गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच सीजनमध्ये विजेतेपदाला गवसणी घातली.

2008 नंतर पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सची टीम आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली होती. त्यांच्यासमोर गुजरातच्या टीमला हरवण्याचं आव्हान होतं. राजस्थान रॉयल्सने ज्या अंदाजात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर क्वालिफायर 2 च्या लढतीत विजय मिळवला होता. त्यामुळे जोरदार सामन्याची अपेक्षा होती. याच सीजनमध्ये दोन वेळा गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला हरवलं होतं. आज फायनलमध्या राजस्थानकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. पण त्यांनी निराश केलं. दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याचं त्यांच स्वप्न भंगलं.

हार्दिक विजयाचा हिरो का?

गुजरात टायटन्सच्या आजच्या विजेतेपदात कॅप्टन हार्दिक पंड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने स्वत:च्या कामगिरीतून उदहारण सादर केलं. हार्दिक पंड्याने चार षटकात फक्त 16 धावा दिल्या व जोस बटलर, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमयार या महत्त्वाच्या विकेट काढल्या. गुजरातच्या अन्य गोलंदाजांनीही चांगली साथ दिली. त्यांनी राजस्थानला निर्धारित 20 षटकात 130 धावांवर रोखलं. फलंदाजीतही हार्दिकने महत्त्वाची भूमिका बजावली. दोन विकेट लवकर गेल्या होत्या. त्यावेळी हार्दिक फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने शुभमन गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वाची ठरणारी 63 धावांची भागीदारी केली. त्याने डावाला आकार दिला. हार्दिक 34 धावांवर युजवेंद्र चहलच्या अप्रतिम चेंडूवर आऊट झाला. त्यानंतर डेविड मिलर आणि शुभमन गिलने संघाला विजय पथावर नेण्याचं काम चोख बजावलं. शुभमन गिलने षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केलं. शुभमन गिलने नाबाद 45 तर मिलरने नाबाद 32 धावा केल्या.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

राजस्थानचा संघ दबावाखाली खेळला

राजस्थानकडून एकही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. त्यांच्या फलंदाजांमध्ये तंबूत परतण्याची जणू स्पर्धाच लागली होती. फक्त ऑरेंज कॅप विनर जोस बटलरने सर्वाधिक 39 धावा केल्या. पण त्यालाही आज गुजरातच्या गोलंदाजांनी मोकळेपणाने फलंदाजी करु दिली नाही. फायनलमध्ये खेळताना तुम्ही दबाव कसा हाताळता? ते खूप महत्त्वाचं असतं. राजस्थानच्या तुलनेत गुजरातने खूप चांगल्या पद्धतीने दबाव हाताळला. उलट राजस्थानचा संघ फलंदाजी करताना दबावाखाली खेळत असल्याचं जाणवलं.

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.