WTC Final : न्यूझीलंडकडून पराभवानंतर निराश विराटची मोठी वक्तव्य, कसोटी संघात होणार बदल, काय म्हणाला कोहली?

| Updated on: Jun 24, 2021 | 1:34 PM

न्यूझीलंडच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम सामन्यात भारताला आठ विकेट्सने पराभूत करत विजय मिळवला. या विजयासह भारताच विश्वविजेता होण्याचं स्वप्न तुटल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने प्रसार माध्यमांशी बोलताना काही महत्त्वाचे निर्णय सांगितले.

WTC Final : न्यूझीलंडकडून पराभवानंतर निराश विराटची मोठी वक्तव्य, कसोटी संघात होणार बदल, काय म्हणाला कोहली?
विराट कोहली
Follow us on

मुंबई : दोन वर्ष अप्रतिम खेळ दाखवून ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या संघाना पराभूत करुन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्यात पोहोचलेला भारतीय संघ न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभूत झाला. पराभवचं खापर सर्वात जास्त कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) फोडलं जात असताना विराटने काही महत्त्वाची वक्तव्य करत भारतीय कसोटी संघात मोठे बदल होणार असल्याचा इशारा दिला आहे. (After losing in ICC WTC Final 2021 against New Zealand Indian Captain Virat Kohli says Important thing and gave some hints of changes in Test Team)

भारतीय संघामध्ये तगडे खेळाडू असतानाही भारताचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला. ज्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 249 धावा करत 32 धावांची लीड घेतली. जी फेडताना भारत 170 धावांवर ऑलआऊट झाला आणि न्यूझीलंडला केवळ 139 धावांचे लक्ष्य मिळाले. जे त्यांनी केवळ 2 विकेट गमावत मिळवले आणि भारताचा पराभव झाला. इतके चांगले खेळाडू असतानाही पराभव झाल्यानंतर ‘या सर्व पराभवाबद्दल सर्व संघ व्यवस्थापन योग्य विचार करेल आणि योग्य पावले उचलेल’ असे विराटने सामन्यानंतर एका ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले.

नाव न घेता साधला निशाना

भारतीय फलंदाजाच्या सुमार कामगिरीमुळेच भारत पराभूत झाला. त्यामुळे विराटने बोलताना फलंदाजावर इशार साधला कोणाचेही नाव न घेता विराटने फलंदाजाच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त केली. सामन्यात वरिष्ठ फलंदाज चेतेश्वर पुजाराने मोठ्या प्रमाणात निराश केलं. पहिल्या डावात 54 बॉल्समध्ये त्याने केवळ 8 धावा केल्या. पहिली धाव घेण्यासाठी पुजाराने 35 चेंडू घेतले. तर दुसऱ्या डावात 80 बॉल्समध्ये 15 धावांच केल्या. या सर्वांवर बोलताना कोहली म्हणाला, ”आम्ही आत्ममंथन करणार आहोत. संघाला आणखी मजबूत करण्यासाठी काय करावं लागेल? याचा विचार करणार आहोत. आम्ही वर्षभर वाट न पाहता लवकरच योग्य निर्णय घेऊन मर्यादित षटकांतील भारतीय संघाप्रमाणे कसोटी संघ करणार आहोत.”

नवीन सुरुवात करावी लागले.

कोहली म्हणाला,‘‘आम्हाला एक नवीन सुरुवात करुन योग्य ती योजना आखावी लागेल.तसेच संघासाठी काय फायदेशीर आहे ते जाणून घेऊन आम्ही निडरपणे कसे खेळू शकणार आहोत. याचाही विचार करावा लागणार आहे. त्यासाठी कोणत्या खेळाडूंना संघात आणावं  लागले याचाही विचार होणार आहे. आधी मानसिक दृष्ट्या ताकदवर होऊन आम्हाला खेळ सुधारावा लागेल.’’

 हे ही वाचा :

WTC Final : भारतीय संघाच्या पराभवानंतर विराटसह विल्यमसनही भावूक, फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

WTC Final 2021 : न्यूझीलंडचा जिगरबाज खेळाडू, कारकीर्दीतील शेवटची कसोटी, बोट तुटलं तरीही खेळतच राहिला…!

WTC Final 2021 : ‘चॅम्पियन’ न्यूझीलंड मालामाल, भारताचाही खिसा गरम, पाहा कुणाला किती बक्षिसाची रक्कम मिळाली…

(After losing in ICC WTC Final 2021 against New Zealand Indian Captain Virat Kohli says Important thing and gave some hints of changes in Test Team)