WTC Final 2021 : न्यूझीलंडचा जिगरबाज खेळाडू, कारकीर्दीतील शेवटची कसोटी, बोट तुटलं तरीही खेळतच राहिला…!

न्यूझीलंडचा विकेटकीपर फलंदाज बीजे वॅटलिंग (BJ Watling) आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटची मॅच खेळला. भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना (WTC Final 2021) त्याच्या कारकीर्दीतला शेवटचा सामना होता.

WTC Final 2021 : न्यूझीलंडचा जिगरबाज खेळाडू, कारकीर्दीतील शेवटची कसोटी, बोट तुटलं तरीही खेळतच राहिला...!
न्यूझीलंडचा विकेट कीपर बी जे वॅटलिंग याचं बोट फ्रॅक्चर...

मुंबई :  न्यूझीलंडचा विकेटकीपर फलंदाज बीजे वॅटलिंग (BJ Watling) आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटची मॅच खेळला. भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना (WTC Final 2021) त्याच्या कारकीर्दीतला शेवटचा सामना होता. याच सामन्यादरम्यान वॅटलिंगसोबत एक अपघात घडला. भारतीय डावादरम्यान एक थ्रो कलेक्ट करताना करंगळीजवळच्या त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. बोट फ्रॅक्चर झालं. पण बोट फ्रॅक्चर होऊनदेखील त्याने आपली विकेट किपिंग सुरुच ठेवली. उपहाराअगोदर त्याला दुखापत झाली होती मात्र उपाहारानंतरही त्याने विकेट किपिंग सुरुच ठेवून आपल्यातल्या जिगरबाज खेळाडूचं दर्शन घडवलं. (India vs New Zealand WTC Final 2021 NZ Wicket keeper BJ Watling Dislocates Finger)

वॅटलिंगच्या जिगरबाज प्रवृत्तीचं आणि खिलाडूवृत्तीचं क्रिकेट विश्वात जोरदार कौतुक

कारकिर्दीतील शेवटची मॅच खेळताना दाखवलेल्या जिगरबाज प्रवृत्तीचं आणि खिलाडूवृत्तीचं क्रिकेट विश्वात जोरदार कौतुक होत आहे. पूर्ण जीव लावून खेळायचं अशी अशी वॅटलिंगची ओळख आहे. त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने तीन कॅच पकडले. त्यातले दोन कॅच त्याने त्यावेळी पकडले ज्यावेळी त्याचं बोट फ्रॅक्चर झालं होतं. याअगोदर बीजे वॅटलिंगने टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळल्यानंतर कसोटी कारकीर्दीतून रिटायरमेंट घेणार आहे, अशी घोषणा केली होती.

बीजे वॅटलिंगची क्रिकेट कारकीर्द

बीजे वॅटलिंगचं संपूर्ण नाव ब्रेडले जॉन वॅटलिंग असं आहे. त्यांना न्यूझीलंडसाठी 74 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 37.1 89 च्या सरासरीनं 3 हजार 789 रन्स त्याने केले आहेत यामध्ये 8 शतकं आणि 19 अर्धशतकं त्याच्या नावावर आहे. 205 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तसंच न्यूझीलंडकडून त्याने 28 एकदिवसीय आणि 5 टी ट्वेन्टी सामने देखील खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 96 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 573 धावा आहेत.

विराटचं स्वप्न भंगलं, न्यूझीलंडकडून भारताचा 8 विकेट्सने धुव्वा

विराट कोहलीचं (Virat kohli) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (ICC WTC Final 2021) जिंकण्याचं स्वप्न भंगलं. किवींनी आठ विकेट्सने भारताला लोळवलं. भारताने न्यूझीलंडला 139 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान अगदी सहज पूर्ण केलं. तत्पूर्वी न्यूझीलंडने बोलिंगमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, नील वॅगनर, काईल जॅमिसन आणि कॉलीन डी ग्रँडहोम या किवींच्या बोलिंग आक्रमणापुढे भारत घायाळ झाला.

(India vs New Zealand WTC Final 2021 NZ Wicket keeper BJ Watling Dislocates Finger)

हे ही वाचा :

WTC Final 2021 : ‘चॅम्पियन’ न्यूझीलंड मालामाल, भारताचाही खिसा गरम, पाहा कुणाला किती बक्षिसाची रक्कम मिळाली…

विराट कोहलीला न्यूझीलंडने नाही हरवलं तर संघातीलच एका खेळाडूने धोका दिला, विराटसह करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

विराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न

WTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI