WTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात अखेर न्यूझीलंडने बाजी मारली आहे. न्यूझीलंडने 8 विकेट्सने भारताचा पराभव केला.

WTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव
India vs New Zealand WTC Final 2021

India vs New Zealand WTC Final 2021 : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात अखेर न्यूझीलंडने बाजी मारली आहे. न्यूझीलंडने 8 विकेट्सने भारताचा पराभव केला. अंतिम सामन्याच्या शेवटच्या आणि राखीव दिवशी न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली. सामन्याचा राखीव दिवस अतिशय रंजक ठरला. भारताच्या या पराभवानंतर न्यूझीलंड जागतिक कसोटी मालिकेत विश्वविजेता ठरला आहे. (India vs New Zealand WTC Final 2021 won by New Zealand by eight wickets know all details)

भारताचा पहिला डाव 217 धावात आटोपला

जागतिक कसोटी सामन्यामध्ये नाणेफेक जिंकत न्युझिलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. त्यानंतर पहिल्या डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करु शकले नाहीत. भारताचा पहिला डाव 217 धावात आटोपला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझिलंडच्या संघाने पहिल्या डावात 249 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात न्यूझिलंडने भारतीय संघाला अवघ्या 170 धावांत गुंडाळलं.

भारताचा दुसरा डाव अवघ्या 170 धावांवर आटोपला

न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचे मातब्बर फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. भारताचे सर्व फलंदाज काही धावांच्या अंतरावर बाद झाले. भारताचा दुसरा डाव अवघ्या 170 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारताकडून फक्त ऋषभ पंतने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर न्यूझीलंडच्या संघाकडून कर्णधार केन विल्यमसन याने 89 चेंडूत 52 तर रोस टेलर याने 100 चेंडूत 47 धावा करत न्यूजीलंडला ऐतिहासिक विजयला गवसनी घालून दिली.

न्यूझीलंडला 139 धावांचं माफक आव्हान

दुसऱ्या डावात टीम इंडियाचा संपूर्ण संघ 170 धावांवर आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडला 139 धावांचं माफक आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी सावध सुरुवात केली. या दरम्यान लॅथम 9 धावा करुन बाद झाला. त्यानंतर डेव्हॉन कॉन्वे 19 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी डाव सावरला. त्यांनी संथ गतीने विजयाच्या दिशेला मार्गक्रमण सुरु ठेवलं. या दरम्यान, केन याने अर्धशतक झळकावलं. त्याने 89 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. तर टेलरने 100 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या. केन आणि टेलच्या या खेळीमुळे न्यूझीलंडला भारताने दिलेलं आव्हान पेलनं सहज शक्य झालं. शेवटी न्यूझीलंडने भारतावर आठ गडी राखून विजय मिळवला.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज गारद

न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावात 217 धावांवर रोखल्यानंतर दुसऱ्या डावातही केवळ 170 धावांवर थांबवलं. पहिल्या डावात काईल जेमिसनने 5, वॅगेनर, बोल्टने प्रत्येकी 2 आणि टीम साऊथीने 1 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावांत टीम साऊथीने 4, बोल्टने 3, जेमिसनने 2 आणि वेगनरने एक विकेट मिळवला.

इतर बातम्या :

India vs New Zealand Live, WTC Final 2021 6th Day : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडची बाजी

WTC Final मध्ये दुसऱ्या डावांत फलंदाजी करण्याआधीच रॉस टेलरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला तर जगातील तिसरा फलंदाज

WTC Final 2021 : बोलिंगसह बॅटचीही जादू, टीम साऊथीने सचिन तेंडुलकरपासून पॉन्टिगपर्यंत अनेकांना पछाडलं!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI