विराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न

पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) अखेर न्यूझीलंडने बाजी मारली आहे (five reason of team India lost WTC Final 2021).

विराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न
विराट कोहली
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 12:43 AM

साउथम्पटन : पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) अखेर न्यूझीलंडने बाजी मारली आहे. वास्तविक पाहता गेल्या पाच दिवसांपासूनचा खेळ पाहता टीम इंडियाला आजच्या दिवशी विश्व विजेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, या सामन्याच्या राखीव दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर भारताचे शिलेदार फार काळ तग धरु शकले नाहीत. त्यामुळे भारतीयसंघ अवघ्या 170 धावांमध्ये तंबूत परतला. त्यानंतर 139 धावांच्या माफक आव्हानाला न्यूझीलंडने 8 गडी राखत पूर्ण केलं. दरम्यान, या सामन्यात भारताच्या पराभवाची काही ठराविक कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत (five reason of team India lost WTC Final 2021 ).

पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची नाणेफेक न्यूझीलंडने जिंकली होती. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात 217 धावा केल्या. तर किवींनी 249 धावा करुन 32 धावांनी आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात अवघ्या 170 धावांपर्यत मजल मारु शकला. त्यामुळे न्यूझीलंडला अवघ्या 139 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान न्यूझीलंडने 8 गडी राखत पूर्ण केलं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा किताब काबीज केली. या सामन्यात पावसाने मोठं व्यत्यय आणलं. पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसामुळे सामना खेळवता आला नाही. त्यामुळे हा सामना सहाव्या आणि राखीव दिवसापर्यंत खेळवण्यात आला (five reason of team India lost WTC Final 2021).

मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश

भारतीय फलंदाज या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. उपकर्णधार अजिंक्य राहाणे यानेच पूर्ण सामन्यात सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याने पहिल्या डावात 49 धावा केल्या होत्या. त्यापाठोपाठ विराटने 44 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात ऋषभ पंतने सर्वाधिक 47 धावा केल्या. विशेष म्हणजे संपूर्ण सामन्यात एकही खेळाडू साधं अर्धशतकही झळकू शकलं नाही. त्यामुळे भारतीय संघ दोन्ही डावात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरताना दिसला.

दुसऱ्या डावात फार कमी धावा

पहिल्या डावात भारताने 217 धावा केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या डावात भारताला चांगली संधी होती. पण दुसऱ्या डावातही भारतीय संघ चांगली कामगिरी करु शकला नाही. टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात अवघ्या 170 धावांपर्यंत पोहोचू शकली. त्यामुळे न्यूझीलंडसमोर फार मोठं आव्हान उभं राहू शकलं नाही. न्यूझीलंड संघाला अवघं 139 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान किवींनी 8 गडी राखत पूर्ण करत विश्वविजेतेपद काबीज केलं.

किवींच्या खालच्या फळीतील फलंदाजांना रोखण्यात अपयश

न्यूझीलंडच्या वरच्या फळीतील मातब्बर फलंदाज पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे फारसे टिकले नाहीत. भारतीय गोलंदाजांनी त्यांना कमी धावांमध्ये रोखलं होतं. त्यामुळे पहिल्या डावात न्यूझीलंडची 135 धावांवर 5 बाद अशी अवस्था होती. पण त्यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांना रोखण्यात टीम इंडियाला अपयश आलं. किवींच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी विकेट तर सांभाळलीच त्याचबरोबर भारतीय संघाच्या धावांना बरोबरी करत त्यामध्ये आघाडीही घेतली. पहिल्या डावात किवीच्या फलंदाजांनी 249 धावा केल्या.

चांगल्या भागीदारीचा अभाव

कसोटी सामन्यात विजयासाठी भागीदारी निर्णायक ठरतात. या भागीदारीमुळे सामना झुकतो. याचाच प्रत्यय टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला होता. चौथ्या कसोटीत शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी केलेली शतकी भागीदारी प्रत्येक भारतीयाच्या लक्षात आहे. पण विराटसेनेला या महामुकाबल्यात भागीदारी करण्यात अपयश आले. इतकंच काय तर मोजक्या एकट्या दुकट्या खेळाडूचा अपवाद सोडला तर, इतर फलंदाजांना आपली छाप सोडता आली नाही. दुसऱ्या डावात भारताला याचाच फटका बसला. टीम इंडियाला पार्टनरशीप करता आल्या नाहीत. छोटेखानी भागीदारी केल्या असत्या तरी, टीम इंडियाला किवींना विजयासाठी मजबूत टार्गेट देता आलं असतं.

फिरकीपटूंची कमी

या सामन्यात भारतीय संघाकडे न्यूझीलंडच्या तुलनेत चांगले फिरकीपटू नव्हते. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट, टिम साऊथी, कायल जेमीसन या फिरकीपटूंनी धडाकेबाज कामगिरीने आपलं अस्तित्व अधोरेखित करुन दाखवलं. त्यामुळेच सोशल मीडियावर आज भुवनेश्वर कुमारला या सामन्यासाठी घेणं जरुरीचं होतं, अशी चर्चा रंगलेली बघायला मिळाली.

संबंधित बातम्या : 

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव’

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडची बाजी

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.