WTC Final 2021 : म्हणून अंतिम सामन्यात आमचा पराभव झाला, विराटने सांगितली 2 कारणं!

न्यूझीलंड टीम विजयाची हकदार आहे. अंतिम सामन्यात त्यांनी जिगरबाज खेळाचं प्रदर्शन घडवलं. पावसामुळे भारतीय संघाला लय मिळणं मुश्किल झालं होतं, असं विराट म्हणाला. (indian Captain Virat kohli Statement After losing WTC Final 2021)

WTC Final 2021 : म्हणून अंतिम सामन्यात आमचा पराभव झाला, विराटने सांगितली 2 कारणं!
विराट कोहली (भारतीय कर्णधार)
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 8:25 AM

मुंबई : संपूर्ण क्रिकेट विश्वाला ज्या सामन्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपलीय… आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) आठ विकेट्स राखून पराभव केलाय. हा सामना म्हणावा असा रोमांचक झाला नाही… एकतर पहिल्यांदा पावसाने दोन दिवसांचा खेळ वाया गेला आणि नंतर भारतीय फलंदाजांकडून चमकदार कामगिरी बघायला मिळाली नाही. न्यूझीलंडने निर्विवाद वर्चस्व राखलं. परिणामी भारताला पराभवाची चव नाईलाजाने चाखावी लागली. सामना संपल्यानंतर याच गोष्टींना कर्णधार कोहलीने दोषी धरलं. पावसामुळे आम्हाला लय मिळणं मुश्किल झालं, त्यात बॅट्समनकडून म्हणावी अशी कामगिरी झाली नसल्याचं विराट म्हणाला. (Indian Captain Virat kohli Statement After losing WTC Final 2021)

विराट कोहली काय म्हणाला?

“न्यूझीलंड टीम विजयाची हकदार आहे. अंतिम सामन्यात त्यांनी जिगरबाज खेळाचं प्रदर्शन घडवलं. पावसामुळे भारतीय संघाला लय मिळणं मुश्किल झालं होतं. पावसामुळे आम्ही डिस्टर्ब झालो. पावसाने खराब झालेली लय संघाला परत मिळवणं मुश्किल होऊन बसलं”, असं विराट कोहली म्हणाला.

“पावसाने पहिल्या दिवशीचा खेळ वाया गेला आणि खेळ सुरु झाला तर लय पकडणं आम्हाला मुश्किल होऊन बसलं. आम्ही केवळ तीन विकेट गमावल्या पण खेळ जर विनाव्यत्यय सुरु राहिला असता तर आम्ही विकेट न गमावता अधिक रन्स करु शकलो असतो”, असं विराट म्हणाला.

फलंदाजांवर फोडलं खापर

“दुसऱ्या डावांत आम्ही 30 ते 40 धावा अधिक करायला हव्या होत्या. जर आमच्या 30-40 धावा आणखी असत्या तर सामन्याचा निकाल काही वेगळा लागू शकला असता. परंतु भारताचा दुसरा डाव लवकर आटोपला. किवींना विजयासाठी कमी धावांचं टार्गेट मिळालं, त्यांच्या फलंदाजांनी ते टार्गेट पूर्ण केलं”, असंही विराट म्हणाला.

विराटकडून न्यूझीलंडची स्तुती

“न्यूझीलंडच्या संघाला विजयासाठी शुभेच्छा. तीन ते सव्वा तीन दिवसांत त्यांनी सामना जिंकून दाखवला. त्यांनी भारतीय संघाला दबावात ठेवलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी प्लॅननुसार गोलंदाजी केली आणि सामना जिंकवून दाखवला. ते जिंकण्याचे नक्कीच हकदार आहेत”, अशा शब्दात न्यूझीलंड संघाची स्तुतीही विराटने केली.

(Indian Captain Virat kohli Statement After losing WTC Final 2021)

हे ही वाचा :

WTC Final 2021 : न्यूझीलंडचा जिगरबाज खेळाडू, कारकीर्दीतील शेवटची कसोटी, बोट तुटलं तरीही खेळतच राहिला…!

WTC Final 2021 : ‘चॅम्पियन’ न्यूझीलंड मालामाल, भारताचाही खिसा गरम, पाहा कुणाला किती बक्षिसाची रक्कम मिळाली…

विराट कोहलीला न्यूझीलंडने नाही हरवलं तर संघातीलच एका खेळाडूने धोका दिला, विराटसह करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.