
मुंबई : क्रिकेट विश्वात एमएस धोनीने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये एमएस धोनीची गणना होते. धोनी स्वत:हा उत्तम फिनिशरच आहेत. पण दुसऱ्यांकडून सर्वोत्तम कामगिरी करुन घेण्याचा गुण सुद्धा धोनीमध्ये आहे. त्यामुळेच क्रिकेट विश्वातीचल चणाश, हुशार कर्णधारांमध्ये धोनीची गणना होते. धोनी क्रिकेटच्या मैदानावर होता, त्यावेळी ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाला.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने धोनीच्या आयुष्यावरील या चित्रपटात धोनीची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटामुळे धोनीच्या आय़ुष्यातील माहित नसलेले अनेक किस्से समजले.
धोनीची जादू अजूनही कायम
आता धोनीच्या आयुष्यावर दुसरा चित्रपट येत आहे. धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय. फक्त आयपीएलमध्ये धोनी खेळताना दिसतो. धोनी आता पूर्वीसारखा फार क्रिकेट खेळत नाहीय. पण क्रिकेट प्रेमींवर त्याची जादू अजूनही कायम आहे. यंदाच्या आयपीएल 2023 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने विजेतेपद मिळवलं. हे सीएसकेच पाचव विजेतेपद आहे.
One dream, chased by two hearts!?❤️
Directed by Sharan Sharma, starring Rajkummar Rao & Janhvi Kapoor – #MrAndMrsMahi is arriving on the pitch on 15th MARCH, 2024 – in cinemas near you!— Dharma Productions (@DharmaMovies) July 3, 2023
कधी रिलीज होणार चित्रपट?
आता धोनीच्या आयुष्यावर दुसरा चित्रपट येतो आहे. ‘मिस्टर एंड मिसेस माही’ या चित्रपटाच नाव आहे. शरण शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. 15 मार्च 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचा निर्माता कोण?
राजकुमार राव धोनीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. जान्हवी कपूर महीमा म्हणजे साक्षी धोनीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा धोनीचा प्रवास मांडण्यात येणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 मध्ये T20 आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला. 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. धर्मा प्रोडक्शनने सोशल मीडियावर चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. करण जोहरची कंपनी या चित्रपटाची निर्मिती करत आहे.