पाच महिने संघाबाहेर होता, द्रविड कोच होताच ‘या’ खेळाडूचं पालटलं नशीब

| Updated on: Jan 03, 2022 | 5:35 PM

ऑगस्ट 2021 पर्यंत संघाबाहेर होता. आता पाच महिन्यात केवळ संघाचा एक भाग नाहीय, तर त्याला थेट कर्णधार बनवण्यात आले आहे. राहुल द्रविड हेड कोच झाल्यानंतर नशीब पालटलं आहे.

पाच महिने संघाबाहेर होता, द्रविड कोच होताच या खेळाडूचं पालटलं नशीब
Follow us on

डरबन: जोहान्सबर्ग कसोटीत केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळत आहे. विराट कोहली पाठिच्या दुखण्यामुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर गेल्यामुळे राहुलला कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. राहुल पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी त्याला कधीही नेतृत्वाची संधी मिळालेली नाही. रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने केएल राहुलला कसोटी संघाचे उपकर्णधार बनवण्यात आले होते. आता विराट आणि रोहित दोघेही संघात नसल्यामुळे राहुल थेट कर्णधारपद भूषवत आहे. (After Rahul dravid coach Kl rahul captain of team india India vs South Africa johannesburg test)

मागचा काही काळ चढ-उतारांनी भरलेला
केएल राहुलसाठी मागचा काहीकाळ चढ-उतारांनी भरलेला आहे. ऑगस्ट 2021 पर्यंत केएल राहुल संघाबाहेर होता. आता पाच महिन्यात राहुल केवळ संघाचा एक भाग नाहीय, तर त्याला थेट कर्णधार बनवण्यात आले आहे. राहुल द्रविड हेड कोच झाल्यानंतर केएल राहुलचं नशीब पालटलं आहे. मागच्या काही वर्षात केएल राहुल टी 20 आणि वनडे संघाचा महत्त्वाचा भाग आहे. पण कसोटीमध्ये अशी स्थिती नव्हती.

शुभमन गिलच्या दुखापतीमुळे मिळाली संधी
ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2021 पर्यंत केएल राहुल भारतासाठी एकही कसोटी सामना खेळला नाही. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आणि अन्य फॉर्मेटमधल्या चांगल्या कामगिरीमुळे राहुलसाठी कसोटी संघाचे दरवाजे उघडले. ऑगस्ट 2019 मध्ये तो वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. खराब कामगिरीमुळे त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. ऑगस्ट 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर तो पुढचा कसोटी सामना खेळला. शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्यामुळे राहुलला संधी मिळाली. पण त्यानंतर त्याने मागे वळून बघितले नाही.

इंग्लंड दौऱ्यावर राहुलने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. रोहित शर्मासोबत भारताला दमदार सलामी दिली. आता दक्षिण आफ्रिकेतही पहिल्या कसोटीत शतक झळकावले.