
निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची काल बर्थ डे पार्टी झाली. या बर्थ डे पार्टीला बॉलिवूडचे अनेक दिग्गज वेगवेगळ्या ग्लॅमरस लुक मध्ये उपस्थित होते. पण अनुष्का शर्माची गोष्टच वेगळी होती. तिचा लुकच लक्षवेधी ठरला.

अनुष्काच्या या लूकने तिचे चाहते, सेलिब्रिटीच नाही, तर तिचा नवरा विराट कोहलीला सुद्धा मोहात पाडलं.

आपल्या लेडीलवचा स्टनिंग लुक पाहून विराट कोहली क्लीन बोल्ड झाला. अनुष्काने तिचे ब्लॅक कटआउट ड्रेसमधले हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अनुष्काचे हे फोटो पाहून विराट कोहलीला रहावलं नाही त्याने सोशल मीडियावर पत्नीच्या फोटोंवर कमेंट केली आहे.

विराटने अनुष्काचे फोटो पाहून wow म्हटलं आहे तसंच हार्ट इमोजी पोस्ट केलाय. विराट शिवाय इंडस्ट्रीमधल्या अन्य लोकांनी सुद्धा अनुष्काचं कौतुक केलं.