AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arshdeep Singh : विजयाच्या जल्लोषात अर्शदीपवर सर्वात मोठी कारवाई; ICC चा कोणता नियम ठरला अडचणीचा?

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अर्शदीप याच्यावर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे त्याने आपला गुन्हादेखील मान्य केला आहे. त्याच्याविरोधात कोणत्या नियमानुसार कारवाई केलेली आहे, असे विचारले जात आहे.

Arshdeep Singh : विजयाच्या जल्लोषात अर्शदीपवर सर्वात मोठी कारवाई; ICC चा कोणता नियम ठरला अडचणीचा?
ARSHDEEP SINGHImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 10, 2026 | 6:59 PM
Share

Arshdeep Singh And T20 World Cup : भारताने टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. न्यूझीलंड या अतिशय ताकदवान संघाला नमवत भारताने ही कमाल करून दाखवली आहे. या विजयानंतर संपूर्ण देशात मोठा उत्सव साजरा करण्यात आला. भारतीय खेळाडूंनीही आपल्या कुटुंबासोबत हा आनंद साजरा केला. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, भारताचा विजय झाल्याने देशातील सर्व क्रिकेटचे चाहते आणि खाळाडू आनंद साजरा करत आहेत. एकीकडे सगळे हा आनंद साजरा करत असताना मात्र दुसरीकडे भारताच्या एका खेळाडूला जबर धक्का बसला आहे. त्याच्याविरोधात आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. त्याला एक चूक चांगलीच महागात पडली आहे.

नेमकी कारवाई काय करण्यात आली?

भारतीय संघातील गोलंदाज अर्शदीप सिंगविरोदात आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. रविवारी म्हणजेच आठ मार्च रोजी झालेल्या न्यूझीलंडविरोधातील सामन्यात त्याने नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याने मोडलेला हा नियम प्रथम पातळीवरचे आहे, असे आयसीसीने म्हटले आहे. त्यामुळेच त्याच्या मॅचच्या फीपैकी 15 टक्के रक्कम त्याला आता दंड म्हणून भरावी लागणार आहे. अर्शदीपने मैदानावर आचारसंहितेतील अनुच्छेद 2.9 चे उल्लंघन केले असून चुकीच्या पद्धतीने व्यवहार केल्याचे आयसीसीने म्हटले आहे. सामना चालू असताना एखाद्या खेळाडूच्या दिशेने जोरात, चुकीच्या पद्धतीने चेंडू भिरकावल्यास काय करावाई करावी, याबाबत या अनुच्छेद 2.9 मध्ये माहिती देण्यात आलेली आहे.

सामन्यात काय घडलं होतं?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना चालू असताना 11 व्या षटकात अर्शदीपकडून एक चूक झाली होती. त्याने या षटकात न्यूझीलंडचा खेळाडू डॅरिल मिचेल याच्या दिशेने जोरात चेंडू भिरकावला होता. हा चेंडू मिचेलच्या थेट पॅडवर लागला. पंचाच्या नजरेत अर्शदीपची ही कृती अनावश्यक आणि चुकीची होती. त्यामुळेच पंचांनी अर्शदीपच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. गेल्या 24 महिन्यांत अर्शदीपने हा पहिलाच गुन्हा केला होता. त्यामुळे कमीत कमी दंड ठोठावण्यात आला. लेव्हल एकचा गुन्हा असेल तर खेलाडूला त्याच्या मॅचच्या फीपैकी 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागते. अर्शदीपनेही ही कारवाई मान्य केली आहे.

Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार