IND vs PAK | Asia Cup 2023 मध्ये टीम इंडिया-पाकिस्तान पुन्हा भिडणार, केव्हा होणार सामना?

Pakistan vs Team India Super 4 Asia Cup 2023 | आशिया कप 2023 साठी ए ग्रुपमधून दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. पाकिस्तान आणि टीम इंडियाने सुपर 4 साठी क्वालिफाय केलं आहे.

IND vs PAK | Asia Cup 2023 मध्ये टीम इंडिया-पाकिस्तान पुन्हा भिडणार, केव्हा होणार सामना?
भारतीय संघ : रोहित शर्मा (C), हार्दिक पांड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव. लोकेश राहुल, ईशान किशन (WK)
| Updated on: Sep 05, 2023 | 1:30 AM

पल्लेकेले | कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने केलेल्या विजयी भागीदारी केली. टीम इंडियाने या पार्टनरशीपच्या जोरावर नेपाळवर 10 विकेट्सने मात केली. टीम इंडियाला पावसाच्या व्यत्ययामुळे 23 ओव्हरमध्ये 145 रन्सचं सुधारित आव्हान मिळालं. टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीनेच हे आव्हान पूर्ण केलं. टीम इंडियाने 20.1 ओव्हरमध्येच 147 धावा केल्या आणि सामना जिंकला. टीम इंडिया या विजयासह आशिया कप 2023 मध्ये ए ग्रुपमधून सुपर 4 मध्ये पोहचणारी दुसरी टीम (A2) ठरली आहे. तर त्याआधी पाकिस्तान (A1) हा मान मिळवला.

टीम इंडिया सुपर 4 मध्ये पोहचल्याने चाहत्यांसाठी एक मोठी गूड न्युज समोर आली आहे. सुपर 4 मध्ये पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आशिया कप 2023 मध्ये पुन्हा आमनासामना होणार आहे. टीम इंडिया-पाकिस्तान याआधी शनिवारी 2 सप्टेंबर रोजी भिडले होते. भारत-पाक सामन पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे टीम इंडिया-पाकिस्तानला 1-1 पॉइंट विभागून देण्यात आला. हा टीम इंडियाचा या स्पर्धेतील पहिला आणि पाकिस्तानचा दुसरा सामना होता.

पाकिस्तानने पहिला सामना नेपाळ विरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात पाकिस्तानने 238 धावांनी विजय मिळवलेला. त्यामुळे पाकिस्तानच्या खात्यात 2 पॉइंट होते. तर भारत विरुद्ध सामना रद्द झाल्याने 1 पॉइंट मिळाला. त्यामुळे पाकिस्तानच्या खात्यात एकूण 3 पॉइंट्स झाले. पाकिस्तानने तिथेच सुपर 4 मध्ये क्वालिफाय केलं. तर आता टीम इंडियाने नेपाळला धुळ चारत ए ग्रुपमधून सुपर 4 मध्ये धडक दिलीय. त्यामुळे यासह ए ग्रुपमधून सुपर 4 साठी दोन्ही संघ निश्चित झाले आहेत.

पाक-भारत सामना केव्हा?


आता ए ग्रुपमधील हे दोन्ही संघ अर्थात पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध दोन हात करणार आहेत. रविवारी 10 सप्टेंबर रोजी हा सामना श्रीलंकेतील कोलंबो इथे पार पडणार आहे. याआधीच्या सामन्यात पावसामुळे पाकिस्तानला बॅटिंगची संधी मिळाली नव्हती. आता 10 तारखेला पुन्हा सामना होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.

आशिया कपसाठी पाकिस्तान टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.

आशिया कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).