AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 : Ind vs Ban सामन्याआधी टीमला मोठा धक्का, ‘हा’ विकेटकीपर संघातून बाहेर!

आशिया कपमधील सुपर 4 मध्ये इंडिया आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ समोरा समोर येणार आहेत. पण या आधीच या संघातील विकेट कीपर फलंदाज संघातून बाहेर झाला आहे.त्यामुळे सामना सुरु होण्याआधीचं संघाला जबरदस्त झटका बसला आहे.

Asia Cup 2023 : Ind vs Ban सामन्याआधी टीमला मोठा धक्का, 'हा' विकेटकीपर संघातून बाहेर!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 13, 2023 | 10:41 PM
Share

कोलंबो | टीम इंडियाने पाकिस्तान आणि श्रीलंका संघांना पराभूत करत आशिया कप 2023 च्या फायनलचं तिकिट मिळवलं आहे. आता टीम इंडिया बांग्लादेश विरुद्ध सुपर 4 राउंडमधील शेवटचा सामना खेळणार आहे. हा सामना 15 सप्टेंबरला श्रीलंकेतील प्रेमदास स्टेडिअममध्ये होणार आहे.  बांग्लादेश स्पर्धेमधून बाहेर पडली आहे मात्र शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्याआधीच संघातील विकेट कीपर फलंदाज आशिया कपमधून बाहेर गेल्याने  या संघाला मोठा धक्का बसला आहे.

नेमका कोण आहे तो खेळाडू :

इंडिया आणि बांग्लादेश यांच्यात आशिया कपच्या सुपर 4 मधील सामना होणार आहे. जेव्हा जेव्हा इंडिया आणि बांग्लादेश या दोन्ही टीममध्ये सामना असतो तेव्हा हा खेळाडू चांगलाचं चालतो. या विकेट कीपर फलंदाजाने अनेक सामन्यात चांगले प्रदर्शन करुन संघाला विजय मिळवून दिला आहे. हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नाही तर बांग्लादेशचा मुश्फिकुर रहीम आहे. मुश्फिकुर रहीमने अनेकदा टीम इंडिया विरुद्ध चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्याच्या संघात नसण्याने बांग्लादेश संघाला मोठा धक्का बसला आहे.

बाहेर जाण्यामागे नेमकं कारण काय ?

आशिया कप 2023 मध्ये बांग्लादेशचा संघ काही चांगले प्रदर्शन करु शकला नाही. सुपर 4 मध्ये बांग्लादेशला पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासमोर पराभव पत्करावा लागला. त्यामुळे बांग्लादेशचं आशिया कप 2023 मधील आव्हान संपुष्टात आलं. आता बांग्लादेश आणि इंडिया यांच्यात सुपर 4 मधील सामना रंगणार आहे.पण मुश्फिकुर रहीम आपल्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतणार असल्या कारणाने तो संघात नसणार आहे.

आशिया कपसाठी बांगलादेशचा संघ -: शाकिब अल हसन (C), तन्झिद हसन, तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफिफ हुसैन, शरीफुल इस्लाम, मोहम्मद नइम, महेदी हसन, तन्झिम हसन साकी , अनामूल हक, लिटन दास

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?