AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : पाकिस्तान श्रीलंकेच्या मॅचमध्ये पाऊस पडला तर ‘हा’ संघ फायनलमध्ये भारताला भिडणार

Pak vs SL Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील निर्णायक सामना उद्या (गुरूवारी) कोलंबोमधील प्रेमदास स्टेडियमवर पार पडणार आहे.पण या सामन्यात पाऊस पडला तर नेमकं काय होणार आणि कोण फायनलला जाणार? जाणून घ्या.

Asia Cup : पाकिस्तान श्रीलंकेच्या मॅचमध्ये पाऊस पडला तर 'हा' संघ फायनलमध्ये भारताला भिडणार
| Updated on: Sep 13, 2023 | 6:51 PM
Share

मुंबई : आशिया कपमधील सुपर 4 च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तावर दणदणीत विजय मिळवला. विराट कोहली आणि केएल राहुलच्या वादळी खेळीने पाकिस्तानच्या गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडलं. भारताने पाकिस्तानला एकतर्फी हरवल्याने पाकिस्तानचा आत्मविश्वास डाउन झालेला दिसतं आहे. मात्र पाकिस्तानला उद्या श्रीलंका विरुद्ध निर्णायक सामना खेळायचा आहे. हा दोन्ही संघांसाठी सामना करो या मरो असणार आहे.

या सामन्यात जो जिंकेल त्याला आशिया कपच्या फायनलचं तिकिट मिळणार आहे. पाकिस्तानला श्रीलंकेचं आव्हान पेलणं इतकही सोप असणार नाही. पण या निर्णायक सामन्यामध्ये पावसाचे सावट कायम आहे. जर पाऊस पडला तर काय होणार? कोणाला पावसाचा फायदा होणार ? जाणून घ्या.

 या टीमला होणार पावसाचा फायदा

आशिया कपच्या सुपर 4 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव करत फायनलचा पल्ला गाठला आहे. पण आता टीम इंडियासोबत फायनलमध्ये कोण खेळणार हे उद्याच्या सामन्याच्या निकालावर कळणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोघांनीही बांग्लादेशवर मात देवून 1-1 सामना जिंकला आहे. तर दोघांनाही टीम इंडिया समोर हार पत्करावी लागली आहे.

पाकिस्तानला भारताने मोठ्या धावांच्या फरकाने हरवलं असल्याने त्यांचा नेट रनरेट अगदी कमी आहे. तर श्रीलंकेचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. दोन्ही टीमचे 2-2 असे समान गुण आहेत. उद्या जो जिंकेल त्याला आशिया कपच्या फायनलचं तिकिट मिळणार आहे. पण पावसाने सामन्यात व्यत्यय आणला आणि सामना झालाचं नाही तर दोघांनाही समान 1-1 गुण दिला जाईल. श्रीलंकेचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला असल्या कारणाने श्रीलंकेला आशिया कपच्या फायनलचं तिकिट मिळणार आहे.

दरम्यान, उद्याच्या सामन्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मागील आशिया कपमध्येही श्रीलंकेने भारताचा पराभव करत फायनलमध्ये एन्ट्र केली होती. इतकंच नाहीतर फायनलमध्येही श्रालंकेने पाकिस्तान संघाचा पराभव करत आशिया कपवर नाव कोरलं होतं.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.