AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia cup 2025 BAN vs AFG Live Streaming: बांगलादेशसाठी करो या मरो स्थिती, अफगाणिस्तान सलग दुसरा सामना जिंकणार?

Asia cup 2025 Bangladesh vs Afghanistan Live Streaming: अफगाणिस्तानला बांगलादेश विरुद्ध विजय मिळवून सुपर 4 मधील स्थान निश्चित करण्याची संधी आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.

Asia cup 2025 BAN vs AFG Live Streaming: बांगलादेशसाठी करो या मरो स्थिती, अफगाणिस्तान सलग दुसरा सामना जिंकणार?
Litton Das and Rashid Khan AFG vs BANImage Credit source: PTI
| Updated on: Sep 16, 2025 | 12:59 AM
Share

आशिया कप 2025 स्पर्धा रंगतदार स्थितीत पोहचली आहे. या स्पर्धेत साखळी फेरीचा थरार पाहायला मिळतोय. सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी संघांमध्ये चढाओढ आहे. या स्पर्धेतील नववा सामना बी ग्रुपमधील 2 संघांमध्ये होणार आहे. बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान एकमेकांविरुद्ध असणार आहेत. अफगाणिस्तानने आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केलीय. तर बांगलादेशने आपल्या मोहिमेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. मात्र दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे बांगलादेशसाठी अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात करो या मरो अशी स्थिती आहे. तर अफगाणिस्तानकडे सलग दुसरा सामना जिंकून सुपर 4 साठी दावा आणखी मजबूत करण्याची संधी आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? तसेच टीव्ही-मोबाईलवर लाईव्ह मॅच कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना केव्हा?

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना मंगळवारी 16 सप्टेंबरला होणार आहे.

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना कुठे?

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपद्वारे मोबाईलवर लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.

बांगलादेशसाठी आरपारची लढाई

बांगलादेशचा हा साखळी फेरीतील तिसरा तर अफगाणिस्तानचा दुसरा सामना असणार आहे. अफगाणिस्तानने 9 सप्टेंबरला हाँगकाँगला 94 धावांनी पराभूत करत या स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशनेही हाँगकाँगवर 7 विकेट्सने सहज विजय मिळवला. अशाप्रकारे अफगाणिस्तान आणि बांगलादेशने विजयी सलामी दिली. मात्र श्रीलंकेने 13 सप्टेंबरला बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे बांगलादेशला या स्पर्धेत आव्हान कायम राखायचं असेल तर अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवण्याशिवाय पर्याय नाही. राशीद खान अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर लिटन दास याच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.

त्यामुळे आता अफगाणिस्तान मंगळवारी सलग दुसरा विजय मिळवून सुपर 4 साठी दावा मजबूत करणार की बांगलादेश कमबॅक करत आव्हान कायम ठेवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.