Asia cup 2025 PAK vs SL Live Streaming: पाकिस्तान-श्रीलंकेला शेवटची संधी, कुणाचा पत्ता कट होणार?

Asia cup 2025 Pakistan vs Sri Lanka Super 4 Live Streaming: मंगळवारी 23 ऑक्टोबरला सुपर 4 फेरीत आपला पहिला सामना गमावणारे 2 संघ आमनेसामने असणार आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही संघ स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी 2 हात करणार आहे.

Asia cup 2025 PAK vs SL Live Streaming: पाकिस्तान-श्रीलंकेला शेवटची संधी, कुणाचा पत्ता कट होणार?
PAK vs SL Super 4 Asia Cup 2025
Image Credit source: ACC
| Updated on: Sep 22, 2025 | 9:52 PM

आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 फेरीतील सामने खेळवण्यात येत आहेत. आतापर्यंत सुपर 4 फेरीत 2 सामने खेळवण्यात आले आहेत. तर तिसऱ्या सामन्यात ए आणि बी ग्रुपमधील संघ आमनेसामने असणार आहेत. सुपर 4 मधील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्याचत टक्कर होणार आहे. दोन्ही संघांची या स्पर्धेत सारखीच स्थिती आहे. दोन्ही संघांची सुपर 4 फेरीत पराभवाने सुरुवात झाली. त्यामुळे स्पर्धेत कायम राहण्यासाठी दोन्ही संघांना आपल्या दुसऱ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवणं बंधनकारक झालं आहे. मात्र कोणत्या तरी 1 संघाचं पराभवासह स्पर्धेतून आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घेऊयात.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सुपर 4 सामना कधी?

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सुपर 4 सामना मंगळवारी 23 सप्टेंबरला होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सुपर 4 सामना कुठे?

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सुपर 4 सामना अबुधाबातील शेख झायेद स्टेडियममध्ये होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सुपर 4 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सुपर 4 सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सुपर 4 सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सुपर 4 सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपद्वारे मोबाईलवर लाईव्ह मॅच पाहता येईल.

सुपर 4 फेरीत पराभवाने सुरुवात

बांगलादेशने शनिवारी 20 सप्टेंबरला सुपर 4 फेरीतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेवर मात करत विजयी सुरुवात केली. बांगलादेशने या विजयासह श्रीलंकेने साखळी फेरीत केलेल्या पराभवाची परतफेड केली. श्रीलंकेने पहिला सामना गमावला असल्याने त्यांच्यासाठी पाकिस्तान विरुद्ध होणार सामना हा आर या पार असा आहे.

तर दुसर्‍या बाजूला टीम इंडियाने पाकिस्तानवर रविवारी 21 सप्टेंबरला शानदार विजय मिळवला. भारताने यासह विजयी चौकार लगावला. भारताचा हा पाकिस्तान विरुद्धचा दुसरा विजय ठरला. भारताने याआधी पाकिस्तानवर 14 सप्टेंबरला साखळी फेरीतही मात केली होती. त्यामुळे पाकिस्तानसाठीही सुपर 4 फेरीत श्रीलंकेप्रमाणे करो या मरो अशी स्थिती आहे. त्यामुळे पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील सामन्यात कोण जिंकतं आणि कुणाचं पॅकअप होतं? यासाठी निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.