AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia cup 2025 SL vs BAN Live Streaming: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने, Super 4 मध्ये कोण करणार विजयी सुरुवात?

Asia cup 2025 Sri Lanka vs Bangladesh Super 4 Live Streaming: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश या सामन्याने आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीला सुरुवात होणार आहे. जाणून घ्या सविस्तर.

Asia cup 2025 SL vs BAN Live Streaming: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने, Super 4 मध्ये कोण करणार विजयी सुरुवात?
Sri Lanka vs Bangladesh Super 4 Live StreamingImage Credit source: PTI
| Updated on: Sep 19, 2025 | 11:25 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी फेरीची सांगता झाली आहे. साखळी फेरीत एकूण 12 सामने झाले. तर 11 व्या सामन्यानंतर शुक्रवारी सुपर 4 मधील 4 संघ निश्चित झाले. आता शनिवारी 20 सप्टेंबरपासून सुपर 4 फेरीला सुरुवात होणार आहे. सुपर 4 मध्ये 20 ते 26 सप्टेंबर दरम्यान एकूण 6 सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक संघाला सुपर 4 मध्ये 3 सामने खेळायचे आहेत. या 4 पैकी अव्वल 2 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. सुपर 4 फेरीतील पहिल्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे या सामन्यात दोघांपैकी कोणता संघ विजयी सुरुवात करणार? याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.

ए ग्रुपमधून भारत आणि पाकिस्तान या 2 संघांनी सुपर 4 मध्ये प्रवेश केला होता. तर बी ग्रुपमधील शेवटच्या साखळी फेरीतील सामन्यापर्यंत सुपर 4 साठी संघ निश्चित झाले नव्हते. त्यामुळे 2 जागांसाठी 3 संघांमध्ये (श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान) चुरस होती. मात्र श्रीलंकेने अफगाणिस्तान टीमवर मात करत सुपर 4 मध्ये प्रवेश केला. श्रीलंकेने हा सामना कमी फरकाने गमावला असता तरी ते सुपर 4 मध्ये पोहचले असते. मात्र श्रीलंकेने अफगाणिस्तानला पराभूत करत त्यांचं सुपर 4 चं स्वप्न भंग केलं.

तसेच श्रीलंकेने विजयासह बांगलादेशला सुपर 4 मध्ये पोहचवण्यात अप्रत्यक्ष मदत केली. अशाप्रकारे बी ग्रुपमधून सुपर 4 साठी 2 संघ निश्चित झाले. आता सुपर 4 फेरीतील पहिल्या सामन्याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. हा सामना कधी कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना केव्हा?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना शनिवारी 20 सप्टेंबरला होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना कुठे?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.