AUS vs ENG Final, WWC 2022, LIVE Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड वर्ल्डकप फायनल मॅच

| Updated on: Apr 02, 2022 | 10:36 AM

ICC Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. याआधी 1982 आणि त्यानंतर 1988 मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत.

AUS vs ENG Final, WWC 2022, LIVE Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड वर्ल्डकप फायनल मॅच
AUS vs ENG Final, WWC 2022
Image Credit source: ICC
Follow us on

मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील विजेतेपदाच्या लढतीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या (ICC Women’s World Cup 2022) अंतिम फेरीत इंग्लंडसमोर आपले विजेतेपद कायम राखण्याचे आव्हान असेल. इंग्लंड गतविजेता आहे. पण, यावेळी त्यांचा सामना ऑस्ट्रेलियन संघाशी आहे, ज्यांच्याकडे सर्वाधिक वेळा विश्वविजेते बनण्याचा अनुभव आहे. क्रिकेट सामना आयसीसीचा (ICC) असो किंवा इतर कोणत्याही स्पर्धेचा, प्रत्येक ठिकाणी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. आज तर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात उभय संघ भिडणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरतील. ऑस्ट्रेलियाचा संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत एकाही सामन्यात पराभूत झालेला नाही, त्यामुळे या संघाचं पारडं जड आहे. तर इंग्लंडने सुरुवातीचे सलग तीन सामने गमावल्यानंतर कमबॅक करत पुढचे सलग चार सामने जिंकत सेमीफायनलपर्यंत मजल मारली. सेमीफायलनमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला आणि फायनलचं तिकीट मिळवलं.

आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. याआधी 1982 आणि त्यानंतर 1988 मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. आता या वेळीही त्यांनी अंतिम फेरीत इंग्लंडला हरवले तर ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्या विजेतेपदाचा षटकार पूर्ण करेल. यासोबतच हा संघ इंग्लंडविरुद्ध विजयाची हॅटट्रिकही करु शकतो.

AUS vs ENG: सामना कधी आणि कुठे होणार? Live आणि Online Stream कुठे पाहता येईल?

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ICC महिला विश्वचषक 2022 चा अंतिम सामना कधी आणि कोणत्या वेळी खेळवला जाईल?

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ICC महिला विश्वचषक 2022 चा अंतिम सामना रविवारी 3 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता सुरू होईल. या सामन्यासाठी नाणेफेक सकाळी 6 वाजता होणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ICC महिला विश्वचषक 2022 चा अंतिम सामना कुठे खेळवला जाईल?

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ICC महिला विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना क्राइस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ICC महिला विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) कुठे पाहता येईल?

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+हॉटस्टारवर सब्सक्रिप्शनसह पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.

इतर बातम्या

Shahrukh Khan on Andre Russell: आंद्रे रसेल नामक वादळावर शाहरुख खान खूश, म्हणाला, ‘बऱ्याच दिवसांनी…’

IPL 2022 points table : पंजाबविरुद्ध केकेआर विजयी, आयपीएलमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

IPL 2022, MI vs RR Live Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल मुंबई विरुद्ध राजस्थान सामना