AUS vs IND : नितीश रेड्डी आणि पंतने लाज राखली, टीम इंडियाचं 150 धावांवर पॅकअप

Australia vs India 1st Test : टीम इंडियाच्या फलंदाजांनी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. मात्र डेब्युटंट नितीश कुमार रेड्डी आणि ऋषभ पंत या दोघांनी केलेल्या चिवट खेळीमुळे टीम इंडियाला 150 धावांपर्यंत पोहचता आलं.

AUS vs IND : नितीश रेड्डी आणि पंतने लाज राखली, टीम इंडियाचं 150 धावांवर पॅकअप
nitish kumar reddy and rishabh pant
| Updated on: Nov 22, 2024 | 2:15 PM

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रातच टीम इंडियाचा पहिला डाव आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भेदक आणि धारदार बॉलिगंसमोर टीम इंडियाचे फलंदाज निष्प्रभ ठरले. टीम इंडियाला धड 50 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाचा डाव 49.4 ओव्हरमध्ये 150 धावांवर आटोपला. डेब्यूटंट नितीश रेड्डी आणि ऋषभ पंत या दोघांनी केलेल्या चिवट खेळीने टीम इंडियाची लाज राखली. या दोघांच्या खेळीमुळे टीम इंडियाला 150 धावांचा टप्पा गाठता आला. मात्र इतर फलंदाज हे अपयशी ठरले.

टीम इंडियाकडून नितीश कुमार रेड्डी,ऋषभ पंत, केएल राहुल आणि ध्रुव जुरेल या चौघांनी दुहेरी आकडा गाठला. नितीशने 59 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 6 फोरसह 41 रन्स केल्या. ऋषभ पंतने 78 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 37 धावा केल्या. ध्रुव जुरेलने 11 धावा केल्या. तर केएल राहुल टिकून खेळत होता. मात्र थर्ड अंपायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे केएलला मैदानाबाहेर जावं लागलं. केएलने 74 बॉलमध्ये 3 फोरसह 26 रन्स केल्या.

यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडीक्कल या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. विराट कोहली आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी निराशा केली. विराटने 5 आणि सुंदरने 4 धावा केल्या. डेब्यूटंट हर्षित राणा याने 7 तर कॅप्टन जसप्रीत बुमराहने 8 धावा केल्या. तर मोहम्मद सिराज एकही बॉल न खेळता नाबाद परतला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क, कॅप्टन पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाचं 150 धावांवर पॅकअप

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.