AUS vs IND : किंग कोहलीचा तिसऱ्या कसोटीआधी मोठा निर्णय, शुबमन गिलसमोर काय केलं?

Australia vs India 3rd Test : विराट कोहली याने तिसऱ्या सामन्याआधी नेट्समध्ये शुबमन गिल याच्यासह काय केलं? जाणून घ्या.

AUS vs IND : किंग कोहलीचा तिसऱ्या कसोटीआधी मोठा निर्णय, शुबमन गिलसमोर काय केलं?
virat kohli team india test
Image Credit source: AFP
| Updated on: Dec 10, 2024 | 8:56 PM

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हबा द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर आणि तिसऱ्या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. रोहितसेना सध्या अ‍ॅडलेडमध्ये सराव करत आहे. टीम इंडिया लवकरच ब्रिस्बेनच्या दिशेने रवाना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने बॅटिंगसोबतच मोठा निर्णय घेतला आहे. विराटने नक्की काय केलं? जाणून घेऊयात.

किंग कोहलीने काय केलं?

विराटने अ‍ॅडलेडमध्ये नेट्समध्ये घाम गाळला. विराटने नेट्समध्ये बॅटिंग केली. इतकंच नाही, तर विराटने चक्क बॉलिंगही केली. विराटने नेट्समध्ये बॉलिंगचा सराव केला. विराटच्या बॉलिंगच्या सरावाचा फोटो व्हायरल झाला आहे. विराटने अ‍ॅडलेडमध्ये शुबमन गिलसह बॉलिंगचा सराव केला. शुबमनने विराटच्या बॉलिंगचा ‘सामना’ केला. विराटच्या या सरावामुळे तो तिसऱ्या कसोटीत बॉलिंगन करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तिसरा कसोटी सामना केव्हापासून?

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात या मालिकेत अप्रतिम सुरुवात करत विजयी सलामी दिली आणि 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर रोहित शर्मा याच्या कमबॅकनंतर टीम इंडियाने मिळवलेली आघाडी गमावली. रोहितच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसातील पहिल्याच सत्रात पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

virat kohli nets practise

आता मालिकेतील तिसरा सामना हा 14 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातून टीम इंडियासमोर मालिकेत कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.