IND vs AUS: कांगारुंना 212वर गुंडाळल्यानंतर टीम इंडियाचं शतक, पहिला दिवस भारताचा

india a women vs australia a unofficial test day 1: टीम इंडिया ए वूमन्स विरुद्ध वूमन्स ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ आटोपला आहे.

IND vs AUS: कांगारुंना 212वर गुंडाळल्यानंतर टीम इंडियाचं शतक, पहिला दिवस भारताचा
india vs australia
| Updated on: Aug 22, 2024 | 7:13 PM

वूमन्स टीम इंडिया ए ला ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध वनडेनंतर टी 20I मालिकाही गमवावी लागली. त्यानंतर आता 22 ऑगस्टपासून उभयसंघात 4 दिवसांचा अनधिकृत कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिला दिवस हा टीम इंडियाच्या नावे राहिला. टीम इंडियाने आधी ऑस्ट्रेलियाला 212 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 2 विकेट्स गमावून 100 धावांपर्यंत मजल मारली आहे. टीम इंडिया अजून 102 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला दुसर्‍या दिवशी मोठी आघाडी घेण्याची संधी आहे.

दिवसभरात काय काय झालं?

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं आणि 212 धावांवर गुंडाळलं. ऑस्ट्रेलियासाठी जॉर्जिया वॉल हीने सर्वाधिक धावा केल्या. जॉर्जिया वॉलने 95 बॉलमध्ये 12 चौकारांच्या मदतीने 71 धावांची खेळी केली. ग्रेस पार्सन्सने 35 धावांचं योगदान दिलं. मॅटलान ब्राउनने 30 धावा केल्या. केट पीटरसनने 26 धावांची भर घातली. तर एम्मा डी ब्रो हीने 12 रन्स केल्या. या 5 जणांचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या एकीलाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियासाठी कॅप्टन मिन्नू मणी हीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. प्रिया मिश्रा हीने चौघींना बाहेरचा रस्ता दाखवला. तर मन्नत कश्यप हीने 1 विकेट घेतली.

टीम इंडियाची बॅटिंग

त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 36 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 100 धावा केल्या. श्वेता सेहरावत 40 आणि तेजल हसबनीस 31 धावांवर नाबाद परतल्या. तर सुभा सतीश 22 आणि प्रिया पुनियाने 7 धावा केल्या. केट पीटरसन आणि मॅटलान ब्राउन या दोघींनी 1-1 विकेट घेतली.

वूमन्स ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग ईलेव्हन : चार्ली नॉट (कर्णधार), एम्मा डी ब्रो, जॉर्जिया वॉल, निकोल फाल्टम, टेस फ्लिंटॉफ, मॅडी डार्क (विकेटकीपर), मॅटलान ब्राउन, केट पीटरसन, लिली मिल्स, ग्रेस पार्सन्स आणि निकोला हॅनकॉक.

वूमन्स इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : मिन्नू मणी (कर्णधार), श्वेता सेहरावत, प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, बिस्त राघवी, सजीवन सजाना, उमा चेत्री (विकेटकीपर), मन्नत कश्यप, प्रिया मिश्रा आणि सायली सातघरे.