AUS vs SA: Mitchel starc च्या वेगवान चेंडूवर बॅट्समन फक्त डिफेंस करत राहिला आणि बॉल….VIDEO

AUS vs SA: 40 पैकी 22 विकेट या कसोटीच्या दुसऱ्यादिवशी लंचपर्यंत पडलेत.

AUS vs SA: Mitchel starc च्या वेगवान चेंडूवर बॅट्समन फक्त डिफेंस करत राहिला आणि बॉल....VIDEO
aus vs sa 1st test Mitchel starc
Image Credit source: Getty Images
| Updated on: Dec 18, 2022 | 11:51 AM

सिडनी: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये गाबाच्या मैदानात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या कसोटीच्या पहिल्या दोन दिवसात फलंदाजांमध्ये बाद होण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. 40 पैकी 22 विकेट या कसोटीच्या दुसऱ्यादिवशी लंचपर्यंत पडलेत. दोन्ही टीम्सची पहिली इनिंग झालीय. गाबावर विकेट्सचा पाऊस पडतोय. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने एक ऐतिहासिक कामगिरी केलीय. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने आपले 300 विकेट पूर्ण केलेत.

इनस्विंगर रासीला समजलाच नाही

मिचेल स्टार्कला आपला 300 वा कसोटी विकेट घेण्यासाठी फक्त 7 सेकंद लागले. दक्षिण आफ्रिकेचा रासी वॅन डर डुसेच्या रुपाने त्याने 300 वी विकेट काढली. स्टार्कने रासीला क्लीन बोल्ड केलं. स्टार्कचा जबरदस्त इनस्विंगर रासीला समजलाच नाही. दक्षिण आफ्रिकन फलंदाजाच्या स्टम्प उडाला. स्टार्कचा हा खरोखरच अप्रतिम चेंडू होता. रासी डिफेन्स करत राहिला, पण चेंडूने स्टम्पसचा वेध घेतला होता.

टेस्टमध्ये स्टार्कने पहिला विकेट कोणाचा काढलेला?

मिचेल स्टार्कने याच गाबाच्या मैदानात 2011 साली कसोटी डेब्यु केला होता. त्याच ग्राऊंडमध्ये आज त्याने 300 विकेट पूर्ण केल्या. स्टार्कने न्यूझीलंड विरुद्ध डेब्यु केला होता. ब्रेंडन मॅक्कलम त्याचा पहिला विकेट होता.


300 टेस्ट विकेट घेणारा 7 वा ऑस्ट्रेलियन गोलंदाज

टेस्टमध्ये 300 विकेट पूर्ण करणारा स्टार्क 7 वा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीआधी त्याचे 296 विकेट होते. गाबा कसोटीत पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 आणि दुसऱ्याडावात दोन विकेट काढले. शेन वॉर्न, मॅग्राथ, नॅथन लियॉन, डेनिस लिली, मिचेल जॉन्सन आणि ब्रेट ली यांच्या पंक्तीत स्थान मिळवलय.