
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी बाकी आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे एकूण 8 संघ त्यांच्या पद्धतीने सराव करत आहेत. या स्पर्धेतून काही खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलंय. खेळाडूंची इच्छा असूनही फक्त दुखापतीमुळे या खेळाडूंना मनाविरुद्ध बाहेर बसावं लागणार आहे. तर काही असेही खेळाडू आहेत, ज्यांना या स्पर्धेत खेळायची इच्छा होती मात्र त्यांना संधी मिळाली नाही. मात्र एका खेळाडूने कहरच केलाय, असंच म्हणावं लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघात निवड होऊनही या खेळाडूने तडकाफडकी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संघाला मोठा झटका लागला आहे.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑलराउंडर मार्कस स्टोयनिस याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं जाहीर केलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा टी 20i कर्णधार मिचेल मार्श हा आधीच दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यात एकदिवसीय संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे दोघेही या स्पर्धेतून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यात मार्कस स्टोयनिसने निवृत्ती जाहीर करत ऑस्ट्रेलियाचं टेन्शन आणखी वाढवलं आहे.
दरम्यान स्टोयनिसने निवृत्ती घेतल्याने त्याच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कुणाला संधी द्यायची? असा प्रश्न आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासमोर आहे. आता स्टोयनिसमुळे कुणाचं नशिब फळफळणार? हे अधिकृत घोषणा झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
मार्कस स्टोयनिसची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती
🚨 BREAKING 🚨
Australian all-rounder Marcus Stoinis has announced his retirement from ODIs with immediate effect 🏏🇦🇺
The Aussies will now need to find a replacement for him in their Champions Trophy 2025 squad.#Cricket #Stoinis #Australia #ChampionsTrophy pic.twitter.com/hfcSpGbSTN
— Sportskeeda (@Sportskeeda) February 6, 2025
22 फेब्रुवारी, विरुद्ध इंग्लंड, लाहोर
25 फेब्रुवारी, विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
28 फेब्रुवारी, विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि एडम झॅम्पा.