ऑस्ट्रेलियाने एकाच दिवशी न्यूझीलंडला दोनदा पाजलं पराभवाचं पाणी, एकदा 6 विकेट्सने; दुसऱ्यांदा 89 धावांनी

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने क्रीडाप्रेमींना विजयाच्या दोन बातम्या दिल्या आहे. ऑस्ट्रेलियन चाहत्यांना एकाच दिवशी विजयाचा डबल बार अनुभवता आहे. एकदा 6 विकेट्सने, तर दुसऱ्यांना 89 धावांनी विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाने एकाच दिवशी न्यूझीलंडला दोनदा पाजलं पराभवाचं पाणी, एकदा 6 विकेट्सने; दुसऱ्यांदा 89 धावांनी
ऑस्ट्रेलियाने एकाच दिवशी न्यूझीलंडला दोनदा पाजलं पराभवाचं पाणी, एकदा 6 विकेट्सने; दुसऱ्यांदा 89 धावांनी
Image Credit source: Female Cricket Twitter
| Updated on: Oct 01, 2025 | 11:05 PM

ऑस्ट्रेलियन संघाचा क्रिकेटमध्ये दबदबा आहे. मग तो महिला संघ असो की पुरुष संघ… आयसीसी स्पर्धांमध्ये मिळालेल्या ट्रॉफी हे त्याचं प्रतीक आहे. पुरुष आणि महिला संघांनी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ट्रॉफी मिळवल्या आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेट रसिकांसाठी बुधवारचा दिवस खास होता. कारण एकाच दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने दोन आनंदाच्या बातम्या दिल्या. तेही एकाच संघाला म्हणजेच न्यूझीलंडला पराभूत करून.. तुम्हाला प्रश्न पडला असेल एकाच दिवशी दोनदा कसं पराभूत करणार? तर बुधवारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामने पार पडले. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धा दोन संघ आमनेसामने आले होते. तर पुरुष टी20 मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सामना पार पडला. दोन्ही ठिकाणी ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली. पुरुष क्रिकेट संघाने न्यूझीलंडला टी20 सामन्यात 6 गडी राखून मात दिली. तर महिला संघाने न्यूझीलंडचा 89 धावांनी पराभव केला.

पुरुष टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकात 6 गडी गमवून 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 16.3 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. अजून मालिकेतील दोन सामने शिल्लक असून कोण बाजी मारतो याकडे लक्ष लागून आहे. इतकंच काय या विजयासह ऑस्ट्रेलियाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 180 हून अधिक धावा करताना 23 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला. पहिल्या स्थानावर पाकिस्तान असून त्यांनी 180हून अधिक धावा 24 चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केल्या आहेत.

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील सामन्यात ऑस्ट्रेलिायाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 49.3 षटकात सर्व गडी गमवून 326 धावा केल्या आणि विजयासाठी 327 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना न्यूझीलंडने नांगी टाकली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 43.2 षटकं खेळत 237 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात न्यूझीलंडला 89 धावांनी पराभूत केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. कारण मोठ्या फरकाने पराभूत केल्याने नेट रनरेट हा +1.780 इतका आहे.