AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs AUS : मॅथ्यू शॉर्ट सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट, ऑस्ट्रेलियाची वाईट हॅट्रिक, काय झालं?

Bangladesh vs Australia 1st Odi : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू शॉर्ट 9 जून रोजी ढाक्यात बांगलादेश विरूद्धच्या पहिल्याच वनडेत झिरोवर आऊट झाला. मॅथ्यूची झिरोवर आऊट होण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली.

BAN vs AUS : मॅथ्यू शॉर्ट सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट, ऑस्ट्रेलियाची वाईट हॅट्रिक, काय झालं?
Matthew Short DuckImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 09, 2026 | 11:42 PM
Share

पाकिस्तानमध्ये मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया बांगलदेश दौऱ्यात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाला मालिकेआधीच मोठा झटका लागला. अनुभवी फलंदाज ट्रॅव्हीस हेड आणि मिचेल मार्श या दोघांना एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव केला. मात्र ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अपवाद वगळता पहिल्याच सामन्यात ढेर झाले. ऑस्ट्रेलियाचा ओपनर मॅथ्यू शॉर्ट डावातील पहिल्याच बॉलवर आऊट झाला. यासह ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांनी नकोशी हॅट्रिक केली. याबाबतीत आता पापुआ न्यू गिनी (PNG) टीम आघाडीवर आहे. तर आता ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांवर पीएनजीच्या नावावर असलेल्या नकोशा विक्रमाची बरोबरी होण्याची टांगती तलवार आहे.

ऑस्ट्रेलियाचे सलामी फलंदाज अपयशी

ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांना गेल्या 3 एकदिवसीय सामन्यांत एकही धाव जोडता आली नाही. अर्थात ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीतील 1 फलंदाज झिरोवर आऊट झाला आहे. ओपनर म्हणून एकही धाव न करता सर्वाधिक आणि सलग 4 वेळा आऊट होण्याचा नकोसा विक्रम हा पीएनजी टीमच्या नावावर आहे. पीएनजीचे सलामी फलंदाज 2022 साली सलग 4 वेळा झिरोवर आऊट झाले होते. त्यानंतर आता 4 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचे सलामी फलंदाज सलग 3 वेळा झिरोवर आऊट झाले आहेत. ऑस्ट्रेलिया यासह न्यूझीलंडसह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी पहोचली आहे. न्यूझीलंडचे सलामी फलंदाज 2015 साली सलग 3 वेळा अपयशी ठरले होते.

ऑस्ट्रेलियाची नकोशी हॅट्रिक

बांगलदेशने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर 285 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना ओपनर मॅथ्यू शॉर्ट याला भोपळाही फोडता आला नाही. त्याआधी पाकिस्तान दौऱ्यातील दुसऱ्या-तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एलेक्स कॅरी आणि मॅथ्यू शॉर्ट हे दोघे झिरोवर आऊट झाले होते. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीला पाकिस्तान विरूद्धच्या दुसऱ्या वनडेपासून ते बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापर्यंत एकही धाव जोडण्यात यश आलं नाहीय. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीचा बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यातून कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे.

बांगलादेशची विजयी सलामी

दरम्यान बांगलादेशने मायदेशात ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजमध्ये विजयी सलामी दिली. बांगलादेशने हा सामना डीएलएसनुसार 86 धावांना जिंकला. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 284 धावा केल्या. मात्र प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. बांगलादेशसमोर ऑस्ट्रेलियासमोर 42.2 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 191 धावांपर्यंतच मजल मारता आली. मात्र त्यानंतर पावसाने खोडा घातला. खेळाला पुन्हा सुरु होण्यासाठी पोषक स्थिती नव्हती. त्यामुळे बांगलादेश टीमला डीएलएसनुसार विजयी घोषित करण्यात आलं.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच