AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs AUS 1st Odi : बांगलादेशचा धमाका, ऑस्ट्रेलियाचा पहिल्या सामन्यात 86 धावांनी धुव्वा, 21 वर्षांनी कांगारुंवर मात

Bangladesh vs Australia 1st ODI, Match Result : बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर 2005 नंतर तब्बल 21 वर्षांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये विजय मिळवला आहे. बांगलादेशचा हा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा इतिहासातील दुसरा विजय ठरला.

BAN vs AUS 1st Odi : बांगलादेशचा धमाका, ऑस्ट्रेलियाचा पहिल्या सामन्यात 86 धावांनी धुव्वा, 21 वर्षांनी कांगारुंवर मात
Josh Inglish and Nahid RanaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 09, 2026 | 10:07 PM
Share

बांगलादेश क्रिकेट टीमने मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जबरदस्त सुरुवात केली आहे. बांगलादेशने पहिल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा डीएलएसनुसार 86 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने ऑस्ट्रेलियासमोर 285 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाची प्रत्युत्तरात 42.2 ओव्हरमध्ये 9 आऊट 191 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची औपचारिकताच बाकी होती. मात्र तेव्हाच नेमका पाऊस आला. त्यामुळे सामना लांबला. पावसामुळे खेळाला पुन्हा सुरुवात झाली नाही. त्यामुळे अखेर डीएलएसनुसार बांगलादेशला विजयी घोषित करण्यात आलं. बांगलादेशने अशाप्रकारे 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हीस हेड, तन्वीर संघा आणि मिचेल मार्श या तिघांना एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलं आहे. हेड आणि मार्श ऑस्ट्रेलियाचे प्रमुख आणि अनुभवी फलंदाज आहेत. मात्र हे तिघे नसल्याने ऑस्ट्रेलिया अडचणीत वाढ झाली. बांगलादेश याचाच फायदा घेत मालिकेत विजयी सुरुवात करण्यात यशस्वी ठरली.

बांगलादेशची बॅटिंग, तिघांचं अर्धशतक

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशने 4 विकेट्स गमावून 140 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर मोसाद्देक होसेन याने कमाल केली. मोसाद्देक याने बांगलादेशचा डाव सावरला. मोसाद्देक याने बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा केल्या. मोसाद्देक याने 70 बॉलमध्ये नॉट आऊट 86 रन्स केल्या. मोसद्देक व्यतिरित्त बांगलादेशसाठी तांझीद हुसैन याने 54 आणि नजमुल हुसैन शांतो याने 67 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशला 8 विकेट्स 284 धावांपर्यंत मजल मारता आली.

बांगलादेशच्या गोलंदाजांचा कहर

बांगलादेशच्या फलंदाजांनतर गोलंदाजांनी आपली छाप सोडायला सुरुवात केली. तास्कीन अहमद याने ऑस्ट्रेलियाला पहिल्याच बॉलवर झटका दिला. तास्कीनने मॅथ्यू शॉर्टला बोल्ड केलं. तास्कीननंतर मुस्तफिजुर रहमान याने मार्नस लबुशेन याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी छोटेखानी भागीदारी करुन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र यात ऑस्ट्रेलियाला फार यश आलं नाही.

तास्कीन आणि मुस्तफिजूर या दोघानंतर नाहीद राणा याने कमाल केली. नाहीदने ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन जोश इंग्लिस याला आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर तर बांगलादेशच्या गोलंदाजांनी कहर केला. बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाला 12 धावांच्या मोबदल्यात 4 झटके दिले. राणाने या 4 पैकी 3 विकेट्स मिळवल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पराभवाच्या छायेत होती. मात्र ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन मैदानात असल्याने ऑस्ट्रेलियाचे थोडी फार आशा होती. कॅमेरुनने अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला 191 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली. मात्र पावसाने विश्रांती न घेतल्याने बांगलादेशला डीएलएसनुसार विजयी घोषित करण्यात आलं.

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली