PAK vs WI : बाबर आझम थोडक्यात विराटचा विक्रम मोडण्यात चुकला, पाकिस्ताननं दुसरी वनडे 120 धावांनी जिंकली

| Updated on: Jun 11, 2022 | 9:27 AM

बाबर आझम विराट कोहली आणि रॉस टेलरचा विक्रम तो मोडू शकला नाही.

PAK vs WI : बाबर आझम थोडक्यात विराटचा विक्रम मोडण्यात चुकला, पाकिस्ताननं दुसरी वनडे 120 धावांनी जिंकली
बाबर आझम, विराट कोहली
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानने (PAK) दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजवर (WI) 120 धावांनी दणदणीत विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिला सामना यजमानांनी पाच विकेटनं जिंकला होता. मुलतान येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात इमाम-उल-हक (72) आणि बाबर आझम (Babar Azam) (77) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्ताननं वेस्ट इंडिजसमोर 50 षटकांत 8 गडी गमावून 275 धावा केल्या. या धावसंख्येसमोर पाहुणा संघ 155 धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने सर्वाधिक चार विकेट घेतल्यानं तो सामनावीर ठरला. दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा 50 धावांचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी ठरला. पण त्याचे शतक हुकले. या खेळीसह त्याने सलग 6 डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि मॅथ्यू हेडन यांना मागे टाकलं.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, फखर जमान संघाला चांगली सुरुवात करण्यात पुन्हा अपयशी ठरला. तो वैयक्तिक 17 धावांवर बाद झाला. यानंतर इमाम-उल-हक आणि बाबर आझम यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. या दोन्ही खेळाडूंची ही 21वी शतकी भागीदारी होती. पण, ही भागीदारी निराशाजनक पद्धतीने संपुष्टात आली. इमाम-उल-हक समन्वयाच्या अभावी धावबाद झाला आणि त्याने मैदानावर बॅट मारून आपला राग व्यक्त केला. काही वेळानं बाबर आझमही बाद झाला आणि त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही.

हे सुद्धा वाचा

बाबर आझमला विराटचा विक्रम मोडता आला नाही

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा 50 धावांचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी ठरला. पण त्याचे शतक हुकले. या खेळीसह त्याने सलग 6 डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि मॅथ्यू हेडन यांना मागे टाकलं. परंतु विराट कोहली आणि रॉस टेलरचा विक्रम तो मोडू शकला नाही. सलग 6 डावात 628 धावा करण्याचा विक्रम टेलरच्या नावावर आहे. तर कोहलीने त्याच डावात 617 धावा केल्या. या 77 धावांसह बाबर आझमला केवळ 614 धावा करता आल्या आणि तो कोहलीचा विक्रम मोडण्यापासून फक्त 4 धावांनी मागे होता.

वेस्ट इंडिजचा संघ 155 धावांवर आटोपला

276 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शाहीन आफ्रिदीनं शे होपच्या रूपानं पहिल्याच षटकात वेस्ट इंडिज संघाला पहिला धक्का दिला. मात्र, यानंतर काईल मेयर्स (33) आणि शमराह ब्रूक्स (42) यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाची धुरा सांभाळली. हे दोन खेळाडू बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ पत्त्याच्या गठ्ठासारखा कोसळला. यानंतर कर्णधार निकोलस पूरनशिवाय एकाही फलंदाजाला 25 धावांचा आकडा गाठता आला नाही. 12 जूनला या मैदानावर मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे.