AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: खेळाडूंसोबत अज्ञात व्यक्तींचा वावर, बसमधून एकत्र फिरत असल्याने बीसीसीआयचा संताप

आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. असं असताना बीसीसीआयच्या निदर्शनात काही चुकीच्या गोष्टी आल्या आहे. काही संघांच्या खेळाडूंच्या बसमध्ये काही अज्ञात व्यक्ती फिरत असल्याचं दिसून आलं आहे. इतकंच काय खेळाडूसोबत हॉटेलमध्येही जात आहे. त्यामुळे बीसीसीआयने संताप व्यक्त केला असून कारवाईचा इशारा दिला आहे.

IPL 2026: खेळाडूंसोबत अज्ञात व्यक्तींचा वावर, बसमधून एकत्र फिरत असल्याने बीसीसीआयचा संताप
IPL 2026: खेळाडूंसोबत अज्ञात व्यक्तींचा वावर, बसमधून एकत्र फिरत असल्याने बीसीसीआयचा संतापImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 07, 2026 | 8:10 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत एकीकडे विक्रम रचले आहेत, तर दुसरीकडे वादही होत आहे. विक्रमांपेक्षा वादाची चर्चा सोशल मीडियावर जास्त होत असते. यंदाचं पर्वालाही वादाची किनार लाभली आहे. मग ड्रेसिंग रूममध्ये ई सिगारेट पिण्याचं प्रकरण असो की डगआऊटजवळ मोबाईलचा वापर असो की आणखी काही.. वादग्रस्त गोष्टींची चर्चा होत आहे. यात आता आणखी एक भर पडली आहे. आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंसोबत काही अज्ञात आणि बाहेरील व्यक्ती फिरत असल्याचं दिसून आलं आहे. टीम बस आणि संघाच्या खेळाडूंसोबत अज्ञात व्यक्तींचा वावर पाहायला मिळाल्याने बीसीसीआयने संताप व्यक्त केला आहे. इतर काही अनोळखी व्यक्ती खेळाडू थांबलेल्या हॉटेल्समध्येही भेट देत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने आता कारवाईचा बडगा उचलण्याची तयारी केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सैकिया यांनी सर्व संघ आणि खेळाडूंना सूचना जारी करून आयपीएल नियमांचं पालन करण्याचं आव्हान केलं आहे. अन्यथा कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

काय म्हणाले देवजित सैकिया?

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, ‘आम्हाला असे समजले आहे की, काही संघ आणि खेळाडूंसोबत अज्ञात व्यक्ती फिरत आहेत. ते टीम बस आणि हॉटेलमध्येही प्रवेश करत आहेत. आम्ही सर्व फ्रँचायझी आणि खेळाडूंना एक सूचना जारी करू. त्याचे पालन न केल्यास, दोषी आढळलेल्यांवर कारवाई केली जाईल.’ सर्व आयपीएल खेळाडूंना केवळ टीम बसमधूनच प्रवास करणे बंधनकारक आहे आणि ते स्वतःची वाहने वापरू शकत नाहीत. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनाही टीम बसमध्ये चढण्यास मनाई आहे. हा नियम सुरक्षा राखण्यासाठी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी लागू करण्यात आला आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरूवातीपासून काही खेळाडू आपल्या गर्लफ्रेंडसोबत फिरताना दिसले आहेत. यात काही जण खेळाडूंसोबत टीमच्या बसमध्ये प्रवास करताना आढळून आले आहेत. तर काही जण हॉटेलमध्ये खेळाडूंसोबत फिरताना दिसले. देवजित सैकिया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, काही संघ मालक आणि अधिकारी खेळाडूंसोबत अशा ठिकाणी जात आहेत, जिथे त्यांना जाण्यास सक्त मनाई आहे. थेट सामन्यांदरम्यान संघ मालकांना ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश दिला जात नाही.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?