AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pat Cummins: पॅट कमिन्स आयपीएल ठोकणार रामराम? 114 कोटींची ऑफर मिळाल्याने चर्चांना उधाण

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला मोठी ऑफर मिळाली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये मिळणारी रक्कम नगण्य असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पुढच्या पर्वात आयपीएलला रामराम ठोकू शकतो, अशी सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

| Updated on: May 07, 2026 | 7:15 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरूवातीच्या काही सामन्यात पॅट कमिन्स खेळला नाही. दुखापतीमुळे त्याला खेळता आलं नव्हतं. पण आता त्यानं संघात पदार्पण केलं असून सनरायझर्स हैदराबादची धुरा हाती घेतली आहे. असं असताना त्याला या स्पर्धेदरम्यान मोठी ऑफर मिळाली आहे. (Photo: IPL/BCCI)

1 / 5
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याचासोबतचा करार तीन वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याला 12 मिलियन म्हणजेच 114 कोटी देण्याची ऑफर दिली आहे. लीग स्पर्धेतील त्याचा इंटरेस्ट कमी करण्यासाठी इतकी मोठी ऑफर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिल्याची चर्चा आहे. कारण जास्तीत जास्त सामने देशासाठी खेळता येतील. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
पॅट कमिन्सला आयपीएलच्या एका पर्वात 18 कोटी रुपये मिळतात. तर त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाची ऑफर स्वीकारली तर त्याला वर्षाला 33 ते 34 कोटी मिळू शकतात. त्यामुळे त्याच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट प्रमुख जेम्स ऑलसॉप यांनी सांगितले की, पॅट कमिन्स बऱ्याच काळापासून ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याला ही ऑफर दिली आहे. आम्हाला माहित आहे की बाजारातील दबावाचा परिणाम सर्वाधिक व्यावसायिक मूल्य असलेल्या खेळाडूंवर होत आहे. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
अहवालानुसार, कमिन्सला तो कितीही सामने खेळला तरी, पूर्वीपेक्षा जास्त मानधनाची हमी देण्यात आली आहे. मात्र, पॅट कमिन्सने अद्याप या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कमिन्स हा प्रस्ताव स्वीकारतो की नाही, यावरच त्याच्या भविष्यातील योजना अवलंबून असतील. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं