Asia Cup 2023 साठी भारतीय संघ जाहीर, पाकिस्तान विरुद्ध सामना केव्हा?

| Updated on: Jun 02, 2023 | 4:18 PM

क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

Asia Cup 2023 साठी भारतीय संघ जाहीर, पाकिस्तान विरुद्ध सामना केव्हा?
Follow us on

मुंबई | आशिया कप स्पर्धेच्या आयोजनाचा वाद गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. बीसीसीआय आणि पीसीबी या दोन क्रिकेट बोर्डांमध्ये आयोजनाच्या मुद्द्यावरुन वाद रंगला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मात्र आशिया कप स्पर्धेची वाट पाहावी लागत आहे. या आशिया कपबाबत अजूनही कोणता निर्णय झालेला नाही. पाकिस्तानला आशिया कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला तर आम्ही तिथे जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका बीसीसीआय सचिव जय शाह यांची आहे. मात्र या दरम्यान बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे या क्रिकेट चाहत्यांना भारत-पाक या कट्टर प्रतिस्पर्धी संघामधील सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

बीसीसीआयचं ट्विट

बीसीसीआयने आशिया कप स्पर्धा 2023 साठी भारतीय संघ जाहीर केला आहे. मात्र हा पुरुष संघ नसून महिला संघ आहे.बीसीसीआयने वुमन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धेसाठी 14 सदस्यीय टीम इंडिया ए संघ जाहीर केला आहे. श्वेता सेहरावत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सौम्या तिवारीकडे उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.

स्पर्धेचं असंय आयोजन

या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांची प्रत्येकी 4 अशा एकूण 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडिया ए सह ए ग्रुपमध्ये पाकिस्तान ए, हाँगकाँग ए आणि थायलंड ए संघांचा समावेश आहे.

तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका ए, बांगलादेश ए, यूएई ए आणि मलेशिया ए अशा संघांचा समावेश आहे.या मालिकेतील अंतिम सामना हा 12 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

भारत-पाक सामना केव्हा?

हाँगकाँगमधील टिन क्वाँग रोड रिक्रिएशन ग्राउंडमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होतेय. तर टीम इंडिया आपला पहिला सामना हा 13 जून रोजी खेळणार आहे. भारतासमोर सलामीच्या सामन्यात हाँगकाँग ए संघांचं आव्हान असणार आहे.तर दुसरा सामना हा भारत विरुद्ध थायलंड ए असा असणार आहे. तर तिसऱ्या सामन्यात भारत-पाक आमनेसामने असतील. हा थरारक सामना 17 जून रोजी रंगणार आहे.

इंडिया ए एमर्जिंग वूमन्स टीम : श्वेता सेहरावत (कॅप्टन), सौम्या तिवारी (उपकर्णधार), त्रिशा गोंगडी, मुस्कान मलिक, श्रेयांका पाटील, कनिका आहुजा, उमा चेत्री (विकेटकीपर), ममथा माडीवाला (विकेटकीपर), तीतस साधू, यशश्री एस, काशवी गौतम, पार्शवी चोप्रा, मन्नत कश्यप आणि बी अनुषा.