
आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य खेळाडूंची चाचपणी करण्याचं सर्वात मोठं व्यासपीठ हे देशांतर्गत क्रिकेट आहे. यासाठी बीसीसीआयने कठोर पावलं उचलली असून मानधनही वाढवलं आहे. असं असताना बीसीसीआयने देशांदर्शत क्रिकेट स्पर्धांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यात काही बदल करण्यात आले आहेत. 14 जूनला झालेल्या बैठकीत बीसीसीआयने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचा सहभागही आहे. रणजी ट्रॉफी 205-26 मध्ये विद्यमान दोन संघांऐवजी फक्त एक संघ एलिट ग्रुपमध्ये खाली जाईल आणि त्याचप्रमाणे प्लेट ग्रुपमध्ये फक्त एका संघाला पदोन्नती मिळेल. ही स्पर्धा दोन टप्प्यात खेळवली जाईल. पहिला टप्पा 15 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान असेल तर दुसरा टप्पा 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान असेल. इराणी कप 1 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत नागपूरमध्ये खेळवला जाईल.
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेची सुरुवात दुलीप ट्रॉफीने होईल. ही स्पर्धा 28 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.दुलीप ट्रॉफी स्पर्धा 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाईल. अंतिम सेट बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे होईल. दुलीप ट्रॉफी आणि सीनियर महिला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघांची निवड राष्ट्रीय निवडकर्त्यांकडून केली जाईल. मागच्या पर्वात बाद फेरीत संघ उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामने खेळत होती. पण आता या पर्वात संघांना सुपर लीगमध्ये तीन अतिरिक्त सामने खेळावे लागतील. गट अ आणि ब मधील अव्वल संघ अंतिम फेरीत भिडतील. गेल्या हंगामातील सर्वात कमी 6 संघ प्लेट ग्रुपचा भाग असतील.
🚨 NEWS 🚨
BCCI convened its 28th Apex Council Meeting on Saturday and made the following key decisions 👇
🔹 A committee to be constituted to formulate comprehensive guidelines aimed at preventing occurrences similar to the victory celebrations in Bengaluru. The committee will… pic.twitter.com/FXEqMO5gU4
— BCCI (@BCCI) June 14, 2025
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्येही मोठे बदल दिसून येतील. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि वरिष्ठ महिला टी20 ट्रॉफी स्पर्धा चार एलिट ग्रुप आणि एका प्लेट ग्रुप फॉरमॅट अंतर्गत खेळवल्या जातील. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 26 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि या स्पर्धेचे लीग सामने 8 डिसेंबर रोजी संपतील. लीग सामने लखनऊ, हैदराबाद, अहमदाबाद आणि कोलकाता येथे खेळवले जातील, तर नॉकआउट टप्पा 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत इंदूरमध्ये होईल.अंडर-16, अंडर-19 आणि अंडर-23 श्रेणीतील काही ज्युनियर आणि महिला स्पर्धा 5 एलिट प्लस वन प्लेट ग्रुप सिस्टम अंतर्गत आयोजित केल्या जातील.
विजय हजारे ट्रॉफी लीग 24 डिसेंबर ते 8 जानेवारी या कालावधीत अहमदाबाद, राजकोट, जयपूर आणि बेंगळुरू येथे खेळवली जाईल, तर नॉकआउट टप्पा 12 ते 18 जानेवारी या कालावधीत खेळवला जाईल.