AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025-27 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया कधी आणि किती सामने खेळणार ते वाचा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसरा विजेता दक्षिण अफ्रिका संघ ठरला आहे. असं असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ल्ड टेस्ट क्रिकेट 2025-27 स्पर्धेची घोषणा केली आहे. यात सहभागी असलेल्या 9 संघात 71 सामने खेळले जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात श्रीलंका बांग्लादेश कसोटीपासून होईल.

WTC 2025-27 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया कधी आणि किती सामने खेळणार ते वाचा
शुबमन गिल कसोटी कर्णधारImage Credit source: PTI
| Updated on: Jun 15, 2025 | 2:47 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तीन पर्व यशस्वीरित्या पार पडली आहे. तिन्ही पर्वात नवा विजेता समोर आला आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण अफ्रिकेने जेतेपदावर नाव कोरलं आहे. असं असताना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. एकूण 9 संघ जेतेपदासाठी लढत देणार आहेत. या पर्वाची सुरुवात 17 जूनपासून होणार आहे. पहिला सामना श्रीलंकेतील गॉलमध्ये श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात होणार आहे. या पर्वात एकूण 71 सामने होणार आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया सर्वाधिक 22 सामने खेळणार आहे. तर इंग्लंड 21 सामने खेळणार आहे. या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड एशेज मालिका होणार आहे. न्यूझीलंड 16, वेस्ट इंडिज 14, दक्षिण अफ्रिका 14, पाकिस्तान 13, श्रीलंका 12 आणि बांग्लादेश 12 कसोटी सामने खेळणार आहे. तर भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा प्रवास 20 जूनपासून होणार आहे. भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना लीड्सवर होणार आहे.

भारतीय संघ एकूण 18 कसोटी सामने खेळणार

भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व शुबमन गिलच्या खांद्यावर देण्यात आलं आहे. दोन वर्षात टीम इंडिया 18 कसोटी सामने खेळणार आहे. यापैकी पाच कसोटी सामन्यांची मालिका ही इंग्लंडविरुद्ध आहे. तर उर्वरित 13 सामन्यात वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंडशी खेळणार आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्याच देशात खेळणार आहे. तर श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धचा सामना त्या्ंच्या देशात होणार आहेत. इंग्लंडविरुद्ध 5, वेस्ट इंडिजविरुद्ध 2, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5, श्रीलंकेविरुद्ध 2 आणि न्यूझीलंडविरुद्ध 2 सामने असतील.

  • इंग्लंड: 5 सामन्यांची मालिका (20 जूनपासून इंग्लंडमध्ये)

  • ऑस्ट्रेलिया: 5 सामन्यांची मालिका (भारतामध्ये)

  • वेस्ट इंडिज: 2 सामन्यांची मालिका (भारतामध्ये)

  • दक्षिण आफ्रिका: 2 सामन्यांची मालिका (भारतामध्ये)

  • श्रीलंका: 2 सामन्यांची मालिका (श्रीलंकेत)

  • न्यूझीलंड: 2 सामन्यांची मालिका (न्यूझीलंडमध्ये)

तिसऱ्या पर्वात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावल्याने भारताला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठायची असेल तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचं मोठं आव्हान असणार आहे. या दोन मालिकांमध्ये यश मिळालं तर भारताचा प्रवास सुकर होईल. अन्यथा इतर संघांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून राहावं लागेल. दरम्यान दक्षिण अफ्रिकन संघ पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. तर सप्टेंबर 2026 मध्ये दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांची मालिका असेल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?