AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi Mimicry : राहुल गांधींकडून मोदींची मिमिक्री, भर मंचावर करून दाखवली ती अ‍ॅक्शन, व्हिडीओ एकदा पाहाच!

राहुल गांधी काँगेसच्या राष्ट्रीय संमेलनात उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी मंचावर उभे असताना ते मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर बोलत होते. मोदींचे परराष्ट्र धोरण किती फोल आहे, हे सांगत असताना त्यांनी अचानकपणे मोदींची अॅक्शन करून दाखवली.

Rahul Gandhi Mimicry : राहुल गांधींकडून मोदींची मिमिक्री, भर मंचावर करून दाखवली ती अ‍ॅक्शन, व्हिडीओ एकदा पाहाच!
rahul gandhi narendra modi mimicryImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 10:48 PM
Share
Rahul Gandhi Narendra Modi Mimicry : लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. नीट पेपरफुटीविरोधातील दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यावर सडकून टीका करत आहेत. विद्यार्थ्यांवर पॅलेट गनच्या मदतीने विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. अमित शाहा यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी करत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदांच्या माध्यमातून राहुल गांधी हे वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन केंद्र सरकारला धारेवर धरताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान आज (13 ऑगस्ट) दिल्लीमध्ये काँग्रेसतर्फे राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर राहुल गांधी यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी मोदींची चक्क मिमिक्री केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

नेमकं काय घडलं?

राहुल गांधी काँगेसच्या राष्ट्रीय संमेलनात उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी मंचावर उभे असताना ते मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर बोलत होते. मोदींचे परराष्ट्र धोरण किती फोल आहे, हे सांगत असताना त्यांनी अचानकपणे मोदींची अॅक्शन करून दाखवली. पंतप्रधान मोदी परदेशातील नेत्यांची भेट घेताना त्या नेत्याची थेट गळाभेट घेतात, असं राहुल गांधी यांना सांगायचं होतं. गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नसतं, असं राहुल गांधी यांना सुचवायचे होते. हे सर्व सांगत असताना राहुल गांधी यांनी मंचावर उपस्थित असलेल्या एका सहकाऱ्याला बोलावले. इकडे या म्हणत त्यांनी संबंधित सहकाऱ्याची थेट गळाभेट केली. राहुल गांधी यांनी सहकाऱ्याची गळाभेट घेताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

काँग्रेसने शेअर केला व्हिडीओ

दरम्यान, राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.राहुल गांधी यांनी केलेल्या मिमीक्रीचा व्हिडीओ काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर खात्यावरही शेअर केला आहे. मोदी हे परदेशी नेत्यांच्या जबरदस्ती गळ्यात पडतात अशी टीका काँग्रेसने या व्हिडीओत केली आहे.

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन