AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लक्ष द्या! कल्याण ते बदलापूर, या दिवशी वीजपुरवठा बंद, वेळ काय? वीज परत कधी येणार?

Kalyan Power Cut : कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर या भागात शुक्रवारी वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागणार आहे.

लक्ष द्या! कल्याण ते बदलापूर, या दिवशी वीजपुरवठा बंद, वेळ काय? वीज परत कधी येणार?
Kalyan power cutImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 13, 2026 | 10:47 PM
Share

कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूरसह परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी या भागासह आसपासच्या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागणार आहे. वडोदरा-मुंबई महामार्गाच्या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या भागात, किती वाजता वीजपुरवठा बंद राहणार ते सविस्तर जाणून घेऊयात.

कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूरमध्ये उद्या वीजपुरवठा बंद

वडोदरा-मुंबई महामार्गाच्या कामासाठी शुक्रवारी कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूरसह अनेक भागांतील वीजपुरवठा बंद राहणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवे कामासाठी 14 ऑगस्ट रोजी महापारेषणची पडघा-मोहने 100 केव्ही लाइन बंद राहणार असल्याने वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 6 ते 11 वाजेदरम्यान कल्याण मंडळ 1 व 2 अंतर्गत अनेक भागांमध्ये टप्याटप्यानी नियोजित वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली.

वीज पुरवठा कधी बंद राहणार?

टिटवाळा, मांडा, बल्याणी, अंबिवली रोड परिसरात सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे. तर खडकपाडा, बारावे, चिकनघर, रामबाग, कर्णिक रोड, पौर्णिमा चौक, रेल्वे हॉस्पिटल आणि रुक्मिणीबाई रुग्णालय परिसरात 5 तास वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा फटका बसणार आहे.

पाणीपुरवठा पंपांवरही परिणाम होणार

योगीधाम, गौरीपाडा, शहाड, बिरला कॉलेज, इंदिरानगर, म्हाडा कॉलनी, कोकण वसाहत आणि संदीप हॉटेल परिसरातही वीजपुरवठा बंद राहणार. अटाळी, वडवली, अंबिवली, नेपच्युन परिसरासह केडीएमसीच्या बारावे आणि अटाळी पाणीपुरवठा पंपांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे काही भागात पाण्याची समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी आवश्यक कामांची खबरदारी घेण्याचे आवाहन

त्याचबरोबर कात्रप, खरवाई, जुवेली, बदलापूर, बापसई, गोवेली तसेच अंबरनाथ रेल्वे स्टेशन, कानसई आणि मोरीवली MIDC परिसरात टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कामांचे नियोजन करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या कल्याण मंडळ 1 व 2 च्या अधीक्षक अभियंत्यांनी केले आहे.

Follow Us
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले