Hardik Pandya: BCCI ने हार्दिक पंड्यासमोर कॅप्टनशिपचा प्रस्ताव ठेवला, पण त्याने…

BCCI ने हार्दिकशी संपर्क साधला, तेव्हा त्याने असं उत्तर दिलं....

Hardik Pandya: BCCI ने हार्दिक पंड्यासमोर कॅप्टनशिपचा प्रस्ताव ठेवला, पण त्याने...
hardik pandya
Image Credit source: bcci
| Updated on: Dec 22, 2022 | 11:34 AM

मुंबई: T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियात मोठे बदल होणार आहेत. T20 साठी कॅप्टन आणि कोचिंग स्टाफ बदलण्याचा प्रस्ताव BCCI च्या विचाराधीन आहे. नियमित कॅप्टन रोहित शर्माला T20 च्या कॅप्टनशिपवरुन हटवण्यात येऊ शकतं. त्याच्याजागी हार्दिक पंड्याच नाव कॅप्टनशिपसाठी आघाडीवर आहे. काल मुंबईत बीसीसीआयच्या अपेक्स काऊन्सिलची मीटिंग झाली. त्यात कुठलाही अधिकृत निर्णय झालेला नाही.

त्यानंतर निर्णय जाहीर होईल

बीसीसीआयच्या टॉप अधिकाऱ्यांनी, T20 चं नेतृत्व हार्दिकने स्वीकाराव यासाठी त्याच्याशी चर्चा केली. यावर हार्दिकने उत्तर देण्यासाठी बीसीसीआयकडे वेळ मागून घेतलाय. बीसीसीआय लवकरच नवीन सिलेक्शन कमिटीची नियुक्ती करणार आहे. त्यानंतर हार्दिकची टी 20 च्या कर्णधारपदी नियुक्ती केल्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर करेल.

बघू पुढे काय होतं

वर्ल्ड कप 2023 पर्यत रोहित शर्माला टीमच्या वनडे आणि कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्यात येईल. “आमच्याकडे जो प्लान आहे, त्या बद्दल हार्दिक बरोबर चर्चा केली. त्याने उत्तर देण्यासाठी काही दिवस मागून घेतलेत. याबद्दल अजून निर्णय झालेला नाही. त्याला व्हाइट बॉलची कॅप्टन्सी देण्याचा आमचा विचार आहे बघू पुढे काय होतं” असं एएनआयने बीसीसीआय सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे.

हा निर्णय घेणं मोठी चूक ठरेल

“शिफारस आणि टीम सिलेक्शनशिवाय सध्याची निवड समिती काही करु शकत नाही. कॅप्टनशिपमध्ये बदल हा मोठा निर्णय आहे. नव्या निवड समितीशिवाय हा निर्णय घेणं मोठी चूक ठरेल. रोहितला टी 20 च्या कॅप्टनशिपवरुन हटवण्याबद्दल सर्वच अनुकूल नाहीयत. अजून वर्षभर तो कॅप्टन राहील” असं बीसीसीआच्या पदाधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितलं.