T20 World Cup पूर्वी भारतीय संघ खेळणार दोन सराव सामने, असे असेल वेळापत्रक, BCCI चा मास्टर प्लॅन तयार

| Updated on: Sep 18, 2021 | 2:34 PM

आगामी आयसीसी टी-20 विश्व चषकासाठी (T 20 World Cup 2021) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघाची (Team India for WC) घोषणा 8 सप्टेंबर रोजी केली. आता संघाच्या सराव सामन्यांच तारीखही बीसीसीआयने जाहीर केली आहे.

T20 World Cup पूर्वी भारतीय संघ खेळणार दोन सराव सामने, असे असेल वेळापत्रक, BCCI चा मास्टर प्लॅन तयार
भारतीय संघ
Follow us on

दुबई : सध्या सर्वत्र आयपीएलची (IPL 2021) हवा असताना दुसरीकजे आयसीसी टी-20 विश्व चषकाची (T 20 World Cup 2021) चर्चाही जोरदार सुरु आहे. आय़पीएल नंतर लगेचच ही भव्य स्पर्धा सुरु होणार असून  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची (Team India for WC) घोषणा केली. 15 सदस्य असणाऱ्या या संघासोबत  3 राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे. आता या भव्य स्पर्धेआधी सराव म्हणून दोन वॉर्म अप मॅचेस टीम इंडिया खेळणार असून बीसीसीआयने याबाबत माहिती दिली.

IPL 2021 च्या अंतिम सामन्यानंतर 3 दिवसांनंतर विराटची टोळी निळी मैदानात असेल. विश्वचषकाच्या सामन्याआधी सराव सामना खेळण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. BCCI च्या एका अधिकाऱ्याने InsideSport शी बोलताना सांगितले, ”टीम इंडिया T20 वर्ल्ड कपपूर्वी  2 सराव सामने खेळेल. पहिला सामना 18 ऑक्टोबरला तर दुसरा सामना 20 ऑक्टोबरला UAE मध्ये होईस.” दरम्यान हे दोन्ही सराव सामने कोणत्या संघासोबत खेळले जाणार हे अजून निश्चित नसले तरी सूत्रांनुसार हे सामने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरोधात खेळवले जाऊ शकतात.

3 मैदानात 31 सामने

4 मे, 2021 रोजी कोरोनाच्या संकटामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल थांबवण्यात आली होती. आता हीच आयपीएल 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होणार आहे. यंदाच्या आय़पीएलमध्ये 60 सामने असून आतापर्यंत 29 सामने खेळवले गेले आहेत. त्यामुळे उर्वरीत 31 सामने आता युएईत होतील. हे सर्व सामने दुबई, शारजाह आणि अबुधाबीच्या तीनच मैदानात होणार असल्याने साहजिकच खेळपट्टी खेळून खेळून स्लो होणार ज्यामुळे फिरकीपटूंना अधिक फायदा होईल.

टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ – 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

हे ही वाचा :

रवी शास्त्रींना पुन्हा हेड कोच बनण्यात का रस नाही?, स्वत:च सांगितलं कारण, म्हणाले… 

विराटच्या राजीनाम्यानंतर अनिल कुंबळे पुन्हा मुख्य प्रशिक्षक?, का दिला होता कुंबळेने राजीनामा?

रवी भाई आणि रोहितशी बोललो, टी 20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडतोय, विराट कोहलीची पोस्ट जशीच्या तशी

(BCCI Confirms team india will play 2 warm up matches before t20 world cup)